चक्रीवादळाच्या तडाख्यात वीज वितरणाला कोट्यावधीचा फटका; एक हजार वीज खांबांना वादळाचा तडाका…

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी
प्रकाश दांडगे (जळगाव जामोद)
जळगाव जामोद: नुकताच झालेल्या वादळात जळगाव जामोद विभागातील एक हजार खांब कोसळले असून याला दुरुस्तीसाठी एक कोटीच्या वर खर्च अपेक्षित आहे. विशेष म्हणजे सर्वे उद्या परही सुरू आहे. शिवाय शेतकऱ्यांचे झालेले कृषी पंपाचे नुकसान या व्यतिरिक्त आहे. त्यामुळे नुकसानीचा आकडा वाढणार आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या वादळामध्ये सर्वात जास्त नुकसान गरीब व मध्यमवर्ग आणि वीज वितरणाच्या कंपनीचे नुकसान झालेले आहे.
जळगाव जामोद विभागात जळगाव जामोद, नांदुरा व मोताळा, मलकापूर या चार तालुक्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या चार तालुक्याला नुकत्याच झालेल्या वादळाचा लघु दाब व उच्च दाब वाहिनीला जबर फटका बसला आहे. लघुदाब वाहिनीची वीज घरगुती व शेतीसाठी वापरली जाते तर उच्च दाब वाहिनीची वीज 34 व 11 के. व्ही . ला. येते. अर्धा तासाच्या वादळाने मोठमोठे वृक्ष कोसळले. काही वीज वितरण कंपनीच्या विजेच्या खांबावर तर कुठे तारांवर पडले. वादळात अनेक पोल वाकलेत. त्यामुळे शहरांसह गावातील शेतीची विविध काही घंट्यांसाठी गुल झालेली होती. वीज वितरणाच्या कंपनीचा परिणाम सर्वच घटकांवर झाला. सायंकाळी वादळ आल्याने व वीज नसल्याने ती रात्र कुठे नुकसान काय नुकसान या चर्चेत गेली. दुसऱ्या दिवशी युद्धास्तरावर कामे सुरू झाली. सर्वेक्षण सुरू झाले. शेकडो विजेचे खांब वादळात नादुरुस्त झाल्याने वीज लवकरच येईल याची शाश्वती नव्हती. मात्र वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी युद्धास्तरावर माहिती घेणे व पाठपुरावा करणे सुरू केले. वृत्त लिहीपर्यंत वीज वितरण कंपनीच्या जळगाव जामोद विभागातील जळगाव जामोद, नांदुरा व मोताळा, मलकापूर या चार तालुक्यात एक हजार विजेचे खांब कोसळले असून वीज वाहिनीचे नुकसान झाले आहे. दुरुस्तीची कामे जोरात सुरू असून लवकरच ती पूर्ण होतील. उद्यापही सर्वे सुरू आहे. कृषीसाठी चा विजेच्या नुकसानीचा सर्वे सुरू असून नादुरुस्त विजेच्या खांब नुकसानीचा आकडा वाढू शकतो.



