बुलढाणामहाराष्ट्र
संग्रामपूर तालुक्यातील प्रयोगाशील शेतकरी श्री राजेश बोदडे यांचा कांदा बांगलादेशात एक्सपोर्ट करण्यात आला!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस,
प्रतिनिधी संग्रामपूर,
रतन भगत.
सविस्तर वृत्त असे की संग्रामपूर तालुक्यातील एक छोटस गाव टुणकी पण येथून उगम पावलेली मोठी स्वप्न आणि त्या स्वप्नांना सत्यात उतरवणारा एक जिद्दी, मेहनती ,आणि दूरदृष्टी असलेला तरुण शेतकरी राजेश बोदडे म्हणजे नव्या पिढीच्या कृषी क्रांतीचे उदाहरण .पारंपारिक शेतीत बदल करून आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करत त्याने आपल्या कष्टाचं पीक केळी थेट विदेशात पाठवून यशाची नवी उंची गाठली.
त्याचप्रमाणे यंदाही त्याने घेतलेले कांदा पीक हे तितकेच यशस्वी ठरलं . स्थानिक बाजारात मिळालेला रुपये 21 प्रति किलो भाव हे फक्त त्याच्या व्यवस्थापन कौशल्याचं आणि गुणवत्तेचा फलित आहे त्याच्या याच कांद्याचे निर्यात थेट बांगलादेशात झाली आहे हेच या राज्याच्या कृषी दृष्टिकोनातून मोठे यश आहे राजेश हा केवळ एक यशस्वी शेतकरी नाही तर तो तरुण शेतकऱ्यांसाठी एक आशेचा किरण बनलेला आहे त्याचे मेहनत अभ्यास आणि चिकाटी इतरांना पुढे जाण्यासाठी प्रेरणा देते.
आज राजेश बोदडे म्हणजे चुणकी गावाचा नसून तर संपूर्ण संग्रामपूर तालुक्याचा अभिमान आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आदर्श आणि तरुणांसाठी प्रकाश स्तंभ बनलेला आहे .सलामी या कृषी वीराला.



