महाराष्ट्रविदर्भ

तांदळी येथे 76 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा वाशिम जिल्हा प्रतिनिधीअजय गायकवाड वाशिम

तांदळी येथे 76 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा वाशिम जिल्हा प्रतिनिधीअजय गायकवाड वाशिम – : मंगरूळपीर तालुक्यातील तांदळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांदळी येथे 76 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री . परमेश्वर सखाराम चव्हाण हे होते तर उपाध्यक्ष श्री. बंडू बहाकर , शिक्षणतज्ञ श्री . किसन शिंदे , पोलीस पाटील श्री राजु पाटील तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्या सौ . ज्योत्स्ना राठोड, तसेच तांदळी येथील प्रतिष्ठित नागरिक , ग्रा .पं . सदस्या सौ . उमिता पवार , अंगणवाडी सेविका मंदा काकडे व मदतनीस सरला घुमारे उपस्थित होत्या .याप्रसंगी सर्वप्रथम गावातुन प्रभातफेरी काढण्यात आली उपस्थित मान्यवर तथा शिक्षकांनी थोर पुरुषांच्या प्रतिमेचे पूजन केले.विद्यार्थी, विद्यार्थीनींनी स्वातंत्र्य दिन संबंधी दिलेल्या घोषवाक्यांनी प्रभातफेरीची शोभा वाढवली यानंतर शाळेमध्ये येऊन अध्यक्षांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम घेण्यात आला याप्रसंगी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीत व भाषण सादर केली . बालविवाह प्रतिबंधक शपथ घेण्यात आली . श्री हेमंत भाऊ राठोड व श्री दुर्गानंद बहादुरे सर या दोघांतर्फे शाळेला एक एक सिलिंग फॅन सप्रेम भेट देण्यात आला . तसेच श्री गोपाल येवले यांच्या कडून शाळेला कायमस्वरूपी मोफत पाणी व शाळेपर्यंत पाणी आणून देण्यासठीच सर्व खर्च देण्यात आला करिता शाळेतर्फे या सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करण्यात आले, विद्यार्थी व विद्यार्थिनींना बिस्कीट,व गोऴयाचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री तनय कोठावदे सर यांनी केले आणि आभार प्रदर्शन मुख्याध्यापक श्री संदीप पंड्या सर यांनी केले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button