बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

ग्रामदैवत श्री बालाजी महाराजांच्या नगरीत निकम परिवाराकडून अनोखा देखावा; ‘शेतकरी’ वेशभूषेतील गौरी महालक्ष्मीची स्थापना

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

देऊळगाव राजा:स्थानिक ग्रामदैवत श्री बालाजी महाराज यांच्या पावन नगरीत आज ज्येष्ठा गौरी पूजनाच्या पावन पर्वावर निकम परिवाराच्या वतीने एक अत्यंत स्तुत्य आणि आकर्षक देखावा साकारण्यात आला आहे. निकम परिवाराने यंदा आपल्या घरात ‘शेतकरी’ वेशभूषेतील गौरी महालक्ष्मीची स्थापना केली असून, या अनोख्या संकल्पनेची आणि आकर्षक सजावटीची संपूर्ण शहरात जोरदार चर्चा सुरू आहे.

श्री गणरायाच्या आगमनानंतर संपूर्ण शहरातील वातावरण भक्तीने रसरसले आहे. त्यातच गौरी मातेसाठी केली जाणारी साज-सजावट, नैवेद्य आणि पूजेची तयारी यातून आपल्या समृद्ध संस्कृतीची आणि परंपरेची सुंदर अनुभूती निकम यांच्या घरी पाहायला मिळत आहे.

या देखाव्याच्या माध्यमातून निकम परिवाराने बळीराजाबद्दल (शेतकऱ्यांबद्दल) असलेले अथांग प्रेम आणि कृतज्ञतेची भावना अत्यंत देखण्या पद्धतीने मांडली आहे. “आपला बळीराजा नेहमी सुजलाम सुफलाम राहो आणि त्याच्या जीवनात समृद्धी येवो,” अशी भावना निकम परिवाराने यावेळी व्यक्त केली.

हा देखावा पाहण्यासाठी परिसरातील नागरिक गर्दी करत असून, निकम परिवाराच्या या सामाजिक आणि सांस्कृतिक जाणिवेचे सर्वत्र कौतुक होत आहे. माता गौरीच्या कृपाशीर्वादाने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, आरोग्य आणि समाधान नांदो, अशी प्रार्थनाही यावेळी करण्यात आली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button