नगरदेवळ्यात श्रावण सोमवारी मांस विक्री बंद राहणार

*नगरदेवळ्यात श्रावण सोमवारी मांस विक्री बंद राहणार*
नगरदेवळा ता.पाचोरा :हिंदू धर्मियांच्या पवित्र श्रावण महिन्याला सुरुवात झाली असून या महिन्यात भगवान शंकराची आराधना केली जाते.त्यानिमित्ताने भाविक भक्त नियमित मंदिरात जाऊन दर्शन घेतात. या सर्व बाबींचा विचार करून विश्व हिंदू परिषद व बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी मांस विक्री बंद राहावी अशी मागणी केली होती .याला अनुसरून येथील हिंदू मुस्लिम बांधवांनी श्रावणी सोमवारी कुठलेही प्रकारचे मांस विक्री केली जाणार नाही अशी भूमिका घेतली असून यात भोई समाज बांधवांनीही मच्छी विक्री न करण्याचा एकमताने निर्णय घेतला.यावेळी सरपंच, उपसरपंच,सर्व ग्रामपंचायत सदस्य,खाटीक बांधव,भोई समाज बांधव ,मुस्लिम समाजाचे नेते मंडळी, ग्रामस्थ यांनी हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देत गावाचा सलोखा कायम राहील अशी ग्वाही दिली.



