जळगावा जिल्हामहाराष्ट्रमुबई

मुंबईत आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ७३ टक्के पाऊस .

मुंबईत आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ७३ टक्के पाऊस . स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस ठाणे जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल पहूरकर

मुंबईत ऑगस्ट महिना सुरू झाल्यापासून पावसाने ओढ दिली आहे. तर धरणक्षेत्रातही पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे सातही धरणातील पाणीसाठा ८३ टक्क्यांवर स्थिरावला आहे. मुंबईत आतापर्यंत वार्षिक सरसरीच्या ७३ टक्के पाऊस पडला.जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस पडल्यामुळे मुंबईतील १० टक्के पाणी कपात रद्द करण्यात आली आहे. मात्र तरीही धरणातील पाणीसाठा वाढतो का याकडे पालिका प्रशासनाचे लक्ष लागले आहे. पाणीसाठ्यात अद्याप १५ ते १७ टक्के तूट आहे. पावसाचे दीड, दोन महिने शिल्लक असले तरी पाणीसाठ्यात तूट राहू नये याकरीता जलअभियंता विभागही धरणातील पाणी पातळीवर नजर ठेवून आहे.मुंबई महानगरात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ७३.७६ टक्के पाऊस पडला आहे. गेल्यावर्षी यावेळी ७० टक्के पाऊस पडला होता. दरवर्षी मुंबईत अडीच हजार मिमी पाऊस पडतो. जूनपासून आतापर्यंत हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रावर १७९२ मिमी पावासची नोंद झाली, तर सांताक्रूझ केंद्रावर २३५४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button