खानदेशजळगावा जिल्हासंपादकीयसामाजिक

गरीबी शाप नाही.सवय झाली आहे!

गरीबी शाप नाही.सवय झाली आहे!

काल एक महिला सहा वर्षांच्या पोरीला घेऊन अंगणात भीक मागत होती.तिचे शब्द व आवाजात इतके आद्रव होते कि,दगडाला ही पाझर फुटावा.”दे माई भाकर “या शब्दात इतकी कणव होती कि,भीक देणाऱ्याला रडू आले पाहिजे.पण हे असे नेहमीचे,सवईचे झाले होते.म्हणून पाझर फुटणारी काळीज सुद्धा दगडाचे थर घेत होते.ती तरूण महिला.पण केस विस्कटलेले.घाणेरडे कपडे.अंगावर मळाचा थर.पोरगी त्यापेक्षा जास्त भयानक.मला नाही वाटत कि,गाय, म्हैस,बैल,बकरी, कोंबडी इतकी घाण अंगावर घेऊन स्वस्थ बसेल.पण येथे हे जाणिवपूर्वक केले होते म्हणून तसा प्रश्न उपस्थित होत नाही.चीड येत नाही. गरीबी हटाव कार्यक्रम राबवणाऱ्या इंदिरा गांधीची ही तिसरी पिढी राज करीत आहे.या महिलेचा आजोबा आणि आजी याच अवस्थेत असतील.बाप व आई राजीव गांधींच्या काळातील असतील.आता ही महिला राहुल गांधीच्या समकालीन भिकारीची भुमिका करीत आहे. गरीबीची चीड इंदिरा गांधींना , राजीव गांधींना वाटली असेल.म्हणून प्रयत्न केला कि ,गरीबी हटाव.सरकार स्तरावरून, प्रशासकीय स्तरावर ” गरीबी हटाव “चा उपक्रम राबवला गेला.पण ही बाया माणसे ” गरीबी बचाव “मोहीम राबवत आहेत.यांना गरीबी खूप प्रिय आहे.म्हणून गरीबी हटलीच नाही.उलट गरीबी वाढतच गेली.नव्हे, सरकारने गरीबी हटवण्यासाठी जे प्रयत्न केले ते पाहून अनेकांना वाटते,आपण गरीबीतच जगले पाहिजे.म्हणून तर गुजर, राजपूत,मराठा या राज्य करणाऱ्या जमाती सुद्धा गरीबीचा देखावा करून नोकरीत आरक्षण मागत आहेत.प्राण घेतले तरी चालतील पण आमचा गरीबीत समावेश करा.यासाठी गुजर,मीणा,राजपूत,मराठा जमातींची प्रचंड आंदोलने झाली.संविधानात बदल करा पण आम्हाला गरीबीत घ्या.भारतीय लोकांना गरीबी खूप प्राणप्रिय आहे.कारण स्वातंत्र्यानंतर जी खैरात सरकारने वाटली ती पाहून कुबेराने सुद्धा कपडे फाडून रस्त्यावर कटोरा घेऊन भीक मागावी.तर ही कालची महिला बिचारीचा काय दोष?जर तिला भीक मागून ऐशआरामात जगता येत असेल तर कोण कशाला कष्ट करील? जळगाव हून नंदुरबार रेलवेने जातांना एक महिला भीक मागतांना नेहमीच भेटते.ती आधी तरूण होती.तेंव्हाही भीक मागत होती.आता तीस वर्षांनंतर ही भीक मागते.मी विचारले,अहो ताई, तुम्ही तीस वर्षांपासून भीक मागत आहात.आतापर्यंत तुमची ही सवय जायला पाहिजे.म्हणजे तुम्हाला भीक मागायची गरज नसावी.ती म्हणाली,माझा मुलगा कंपनीत नोकरीला आहे.अमळनेरला स्वताचे सिमेंटचे पक्के घर आहे.दोन नातू इंग्लीश मेडियम मधे शिकतात.मी घरी बसून काय करू? त्यापेक्षा भीक मागून किमान दोन तिनशे रूपये कमवते.मुलाला देते.माझे छान कुटुंब आहे.अमुक अमुक मोठ्या गावची सून आहे.मला सर्वच पोलिस आणि टिसी ओळखतात.या महिलेचे नातू केंब्रिज विद्यापीठात शिकायला गेले तरी ही भीक मागणार आहे.तेंव्हा पेपरमधे बातमी झळकून येईल,भीक मागणाऱ्या महिलेचा नातू केंब्रिज विद्यापीठात उच्चशिक्षण घेत आहे.आम्हाला त्या महिलेचा अभिमान वाटतो.आणि हेवा सुद्धा! चला, उद्यापासून आपण ही भीक मागू या!मागून खाय त्याला कमी नाय! मला वाटते,गरीबी हे संकट नाही.ती समस्या नाही.ती अडचण नाही.ती आमची जीवनशैली बनलेली आहे.भीक मागणे ही गरज नाही,सवय बनलेली आहे.भीक मागितल्याने दोन फायदे असतात.एकतर गरीब असल्याचे आत्मसमाधान मिळते.शिवाय दोन पैसे कष्ट न करता मिळतात.याच आत्मसमाधानासाठी भारतातील सत्तर टक्के लोक भीक मागतात.माणसे देतात ती भीक आणि सरकार देते ते अनुदान.असा सुंदर शब्दप्रयोग आम्ही भीकेसाठी वापरतो.भीकेला अनुदान संबोधन करणे,सवलतीला मदत संबोधन करणे ही सुद्धा आमची सत्तर वर्षातील प्रगती समजावी. शाळेतील विद्यार्थ्यांना कपडे फुकट.जेवण फुकट.जेणेकरून शिक्षणाचे प्रमाण वाढावे. तरीही शिक्षणाची गुणवत्ता वाढलीच नाही.पण यातून भ्रष्टाचाराचे फुकट शिक्षण गुरूजींना, शिक्षणाधिकाऱ्यांना,शिक्षण संस्थेच्या चेयरमन व संचालकांना दिले जाते.जळगांव जिल्ह्यातील दोन हजार हेडमास्तरांनी विद्यार्थ्यांच्या युनिफॉर्म मधे भ्रष्टाचार केला.शिक्षणाधिकारी ,बीडीओ व सीईओ च्या संगनमताने.यातील भ्रष्टाचार पारंगत झालेले सीईओ आता कलेक्टर झालेत.पालकमंत्रीच्या संगनमताने डीपीडीसी निधीची लयलूट करीत आहेत.फुकटचे कपडे,जेवण,राशन,घरकुल, शौचालये ही भ्रष्टाचाराची कुरणे तयार झाली आहेत.यातूनच भुरटे चोर मंत्री, पालकमंत्री, मुख्यमंत्री बनलेत.याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी विकास म्हणायला लावतात.नाही म्हटले तर पोलिस,सीआयडी, सीबीआय,इडी चा ससेमिरा मागे लावतात.चोरी करा.लगान द्या.नाहीतर जेलमधे जा. १९२०ते १९४७पर्यंत भारतात स्वातंत्र्य साठी आंदोलने होत असत.आता तर चक्क भीक मिळावी,अनुदान मिळावे,आरक्षण मिळावे म्हणून आंदोलने होत आहेत.आम्ही भारतीय लोकांनी आमच्या उपजत गुणांमधे लक्षणीय वाढ केलेली आहे.भिकारी आणि गुलामी! आतापर्यंत राम, कृष्ण, महादेव,अंबे,भवानी यांची प्रतिमा लटकावून भीक मागत होतो.आता महाराणा प्रतापसिंह, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज या अशा विभुती व महाभुतींच्या प्रतिमा लटकावून भीक मागत आहोत. मेन्टॅलिटी तिच आहे.फक्त स्टॅट्रेजी बदलली आहे…. शिवराम पाटील महाराष्ट्र जागृत जनमंचजळगाव

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button