खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रसामाजिक

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात स्टुडन्ट कौन्सिल इंस्टॉलेशन (विद्यार्थी परिषद स्थापना) समारंभाचे उत्साहात आयोजन

जळगाव जिल्हा प्रतिनिधी

रणधीर पवार

महाविद्यालयीन जीवनामध्ये स्टुडन्ट कौन्सिल विद्यार्थी परिषद हा एक अविभाज्य घटक म्हणून गणला जातो, कारण कौन्सिलच्या माध्यमातून विद्यार्थी व शिक्षक वृंद यांचे परस्पर संबंध अधिक चांगल्या पद्धतीने जोपासले जातात व विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये या स्टुडन्ट कौन्सिलचा मोलाचा वाटा असतो.

याच अनुषंगाने गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयांमध्ये विविध शाखांचे स्टुडन्ट कौन्सिल स्थापनेच्या समारंभाचे आयोजन दिनांक 18 ऑक्टोबर 2023 ला करण्यात आले. या कार्यक्रमात श्री भरत दादा अमळकर(टेक्निकल ॲडव्हायझर,MSBTE, मुंबई), डॉक्टर केतकी पाटील मॅडम (सदस्य, गोदावरी फाउंडेशन) हे उपस्थित होते. त्यांच्यासोबत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, प्रा. हेमंत इंगळे (अधिष्ठाता), डॉ. ईश्वर जाधव (रजिस्ट्रार) व सर्व विभाग प्रमुख तसेच शिक्षक वर्ग आणि सर्व शाखांचे विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून झाली. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
त्यानंतर आलेल्या मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

त्यानंतर स्टुडन्ट कौन्सिल स्थापनेच्या समारंभात सर्व शाखांच्या कौन्सिलच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पदानुसार बॅचेसचे वाटप करून त्यांना गौरवान्वीत केले.

त्यानंतर शाखा निहाय विद्यार्थी प्रेसिडेंट यांनी त्यांच्या विभागाच्या स्टुडन्ट कौन्सिलची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली व आगामी काळात त्यांच्या कौन्सिलच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाचा आढावा प्रेझेंटेशनच्या माध्यमातून दिला. त्यामध्ये निकिता बाविस्कर (CESA), हेमंत झांबरे(MESA), कोणीका पाटील (TESA), ललित पाटील(EESA) यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले.

त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी सांगितले की स्टूडेंट कौन्सिल समारंभा नंतर खऱ्या अर्थाने तुमच्यावर आता नवीन जबाबदाऱ्या येतील व प्रत्येक जबाबदारी तुम्हाला समर्थपणे पार पाडायची आहे असे नमूद केले. स्टुडन्ट असोसिएशनच्या सर्व विद्यार्थ्यांचे त्यांनी कौतुक करताना पुढे येणाऱ्या सर्व समारंभाचे उत्कृष्ट नियोजन करून यशस्वी करण्याबद्दल आवाहन केले.

त्यानंतर कार्यक्रमांमध्ये डॉ. केतकी पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की विद्यार्थी दशेत असताना आपण सर्वांगीण विकास करणे गरजेचे आहे जेणेकरून आपण एक उत्तम लीडर होऊ शकतो. त्यांनी या गोष्टींशी निगडित असलेले उदाहरणांसहित विद्यार्थ्यांना हे पटवून दिले. त्याचप्रमाणे महाविद्यालयामध्ये अशा उपक्रमांना प्राधान्य दिलं जाते ही खूप महत्त्वाची बाब आहे असे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ता श्री भरत दादा अमळकर यांनी वेगवेगळ्या स्तरावर पदे भूषविली आहेत. केसीई सोसायटीचे मॅनेजमेंट कौन्सिल मेंबर, तसेच न्यू एज्युकेशन पॉलिसी ऑफ महाराष्ट्र च्या स्टीरिंग कमिटी मेंबर, तसेच बीटा असोसिएट कंपनीचे प्रोप्रायटर, आणि केशर स्मृती सेवा संस्थांचे चेअरमन म्हणून ते कार्यरत आहे.

श्री भरतदादा अमळकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, आधीच्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारचे प्लॅटफॉर्म नव्हते. पण आज या माध्यमातून वर्किंग टुगेदर आणि पीयर लर्निंग गरजेचे आहे. बऱ्याच वेळेस खेड्यापाड्यातील मुलांमध्ये न्यूनगंड असतो त्यामुळे ते मागे राहतात. पालकांची आर्थिक स्थिती, कम्युनिकेशन स्किल स्किल, धाडस या गोष्टींच्या न्यूनगंडामुळे विद्यार्थी मागे राहतात. अशा विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या प्लॅटफॉर्मचा फायदा नक्कीच होतो.

विद्यार्थ्यांनी वेळेवरच आपले ध्येय ठरवणे गरजेचे असते, त्याचप्रमाणे आपले स्वप्न सांगायला कधीही घाबरू नका, ते धाडसाने लोकांसमोर व्यक्त करा त्यासाठी इच्छाशक्ती महत्त्वाची आहे, हे सर्व त्यांनी उदाहरणासहित विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.

त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या आयोजनाबद्दल व सादरीकरणाबद्दल कौतुक केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्टुडन्ट कौन्सिलचे फॅकल्टी कॉर्डिनेटर प्रा. प्रवीण पाटील (MESA), प्रा. नेमीचंद सैनी (EESA), प्रा. आर. व्ही. पाटील (TESA) व प्रा. निलेश चौधरी (CESA)यांनी डॉ. नितीन भोळे (विभाग प्रमुख, बेसिक सायन्सेस अँड हुम्यानिटिज) यांच्या मार्गदर्शनाखाली परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केतकी टिकले व पूर्वेश बऱ्हाटे यांनी केले. आणि आभार प्रदर्शन सिमरन कोळी या विद्यार्थिनीने केले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button