गिरगावमध्ये वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला पकडलं रंगेहाथ

.
मुंबई पोलिसांनी वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश केला असून त्यातून दोन अभिनेत्रींची सुटका केली आहे. यापैकी एक मराठी चित्रपटांमधील आघाडीची अभिनेत्री असल्याची माहिती समोर येत आहे. तर दुसरी बंगाली आणि बॉलिवूडमध्ये छोट्या भूमिका साकारणारी अभिनेत्री आहे
मुंबई पोलिसांनी गिरगावमधल्या एका हॉटेलमध्ये चालणाऱ्या वेश्याव्यवसायाच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी यातून दोन अभिनेत्रींची सुटका केली आहे. त्यापैकी एक मराठी चित्रपटांमधील मुख्य अभिनेत्री असल्याचं कळतंय. तर दुसरी बंगाली आणि बॉलिवूड चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका साकारणारी अभिनेत्री आहे. या कारवाईदरम्यान सेलिब्रिटींसोबत काम करणारा एक मेकअप आर्टिस्ट असलेला दलालसुद्धा रंगेहाथ पकडला गेला. मुंबई पोलिसांनी या कारवाईबद्दलची माहिती दिली आहे.
कल्याणमध्ये महिला वकिलाच्या पुढाकाराने वेश्या व्यवसायदुसरीकडे कल्याण पूर्व भागातील एका नामांकित हॉटेलमध्ये एक ज्येष्ठ महिला वकील काही गरजू पीडित मुलींना हाताशी धरून वेश्या व्यवसाय चालवत असल्याचा आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ठाणे पोलिसांच्या मानवी तस्करी प्रतिबंधक कक्षाने हा प्रकार उघडकीस आणला असून याप्रकरणी मुख्य सूत्रधार वकील महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.



