नैसर्गिक

24 वर्ष देशसेवा पूर्ण; इंडियन आर्मी जवान सतीश भुतेकर यांचे सवणा भव्य स्वागतस्टार भारत लाईव्ह एक्सप्रेसप्रतिनिधी चिखली:- सलमान पठाण सवणा

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी

भारतीय सैन्यात तब्बल 24 वर्षे देशसेवा पूर्ण केल्याबद्दल सतीश मधुकर भुतेकर यांचा सवणा येथे मित्रमंडळी व ग्रामस्थांच्या वतीने भव्य सदिच्छा व स्वागत सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी संपूर्ण गावात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. गल्लोगल्लीत स्वागताचे बॅनर लावण्यात आले होते. गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली तसेच महापुरुषांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. जागोजागी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
डीजेच्या तालावर युवकांनी उत्साहात नृत्य करत रॅलीमध्ये सहभाग घेतला. सर्व वर्ग मित्रमंडळी, युवक आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. “देशसेवेला सलाम” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
स्वागत सोहळ्यानिमित्त उपस्थित सर्व मान्यवर, प्रमुख पाहुणे व मित्रमंडळी यांचे हार्दिक स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन समस्त वर्गमित्र मंडळ व समस्त गावकरी मंडळी यांच्या वतीने करण्यात आले होते.
कार्यक्रमानिमित्त सर्व गावकऱ्यांसाठी प्रीतीभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. सवणा ग्रामस्थांनी सतीश भुतेकर यांचे हार्दिक स्वागत करत त्यांच्या देशसेवेबद्दल अभिमान व्यक्त केला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button