जळगावा जिल्हामहाराष्ट्रशैक्षणिक

गणित प्रतिभा तपासणी परीक्षेतगोदावरी स्कूलच्या विद्यार्थ्यांना सुवर्णपदक

जळगाव जिल्हा प्रतिनिधी

रणधीर पवार

जळगाव – गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूल, मधील विद्यार्थ्यांनी आयएफएसी गणित प्रतिभा तपासणी (IFSC mathematical talent Probe exam) २०२३-२४ परीक्षेत सहभाग घेऊन सुवर्णपदक प्राप्त केले.
यात इयत्ता पहिलीतील पाटील मोक्ष तुलसीराम, चौधरी ओम भूषण, इयत्ता चौथीतील माने गौरव महेंद्र, बोंडे एक्नेश हेमंत, परदेशी रुद्र प्रताप सिंग सतीश, उमर शेख अब्दुल मजीद, व इयत्ता आठवीतील बोरले हेतिश राजेंद्र यांना प्रमाणपत्र व सुवर्णपदक प्राप्त झाले आहे. त्यांनी प्राप्त केलेल्या यशामुळे त्यांचे गणित या विषयाबद्दल किती सखोल ज्ञान आहे याची जाणीव होते. गणित हा विषय योग्य रीतीने हाताळला तर तो किती सोपा आहे त्यात यश मिळवणे किती सहज आहे हे या चिमूरड्यांनी आपल्या यशातून दाखवून दिले. त्यांनी प्राप्त केलेल्या या यशाबद्दल स्कूलच्या प्राचार्य नीलिमा चौधरी आणि सर्व शिक्षक वृंदांनी त्यांचे अभिनंदन केले.

आपला विश्वासू

राहूल कुलकर्णी
जनसंपर्क अधिकारी

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button