बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

समीर वानखेडे ह्यांच्यावरील खोटे गुन्हे रद्द करुन ज्ञानेश्वर सिंग यांचेवर अनुसूचित जाती जमाती कायद्यानुसार कारवाई करून अटक करावी ; विकास पवार मित्रपरिवार ची निवेदनाद्वारे मागणी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी.

तेल्हारा दि.२७ ; तेल्हारा शहरातील वंचित बहुजन आघाडीचे माजी शहराध्यक्ष विकासजी पवार व त्यांचा मित्र परिवार यांनी काल दिनांक 26 फेब्रुवारी रोजी तेल्हारा तहसील येथे जाऊन ना. तहसीलदार यांचे मार्फत राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांना निवेदन देण्यात आले आहे.
समीर वानखेडे आय.आर.एस.अधिकारी भारत सरकार , ह्यांच्या वरील दाखल केलेला खोटा गुन्हा रद्द करून ज्ञानेश्वर सिंग ह्यांच्यावर अनुसूचित जाती जमाती कायद्यानुसार कारवाई करून त्यांना अटक करण्यात यावी. समीर वानखेडे आय आर एस अधिकारी भारत सरकार हे निष्ठेने व कायद्याच्या चौकटीत राहून आपले कर्तव्य पार पाडत आहेत. समीर वानखेडे हे अकोला जिल्हा ला लागूनच असलेल्या वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्याचे सुपुत्र असून ते प्रामाणिक पणे देशसेवेचे कर्तव्य बजावत असतांना त्यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवून अडचणीत आणणारी चुकीची तक्रार जातीयवादी ज्ञानेश्वर सिंग ह्यांनी दाखल केलेली आहे. ह्यामुळे वानखेडे साहेबांवर आणि त्यांच्या कार्यावर प्रेम करणाऱ्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. तरी समीर वानखेडे साहेब ह्यांच्यावरील अन्यायकारक व जातीय भावनेने दाखल झालेला गुन्हा रद्द करावा व ज्ञानेश्वर सिंग ह्यांच्यावर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायद्या नुसार कारवाई करावी व त्यांना अटक करून खटला चालवावा अशी मागणी विकास पवार व त्यांचा मित्रपरिवारा तर्फे निवेदन देऊन करण्यात आली आहे. ह्यावेळी विकास पवार, अरविंद तिव्हाणे, लखन सोनटक्के, अमर भारसकले, अजय शामस्कर, विक्की मंगळे, सतीश मामनकार, रामा फाटकर,रोशन दारोकार, सचिन गर्जे, किशोर खाडे, सूरज साळुंखे, नितीन वाकोडे, अंकुश सपकाळ, सागर मते, प्रवीण पोहोरकार आदींच्या सह्या निवेदनात नमूद आहेत.
मा.एकनाथजी शिंदे. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई, मा.अजितदादा पवार साहेब, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र, राज्य मुंबई, मा. पोलीस महासंचालक मुंबई म.रा. मुंबई. यांची प्रतिलिपी मध्ये नावे नमुद आहेत.
यावेळी विजय देशमुख,चेतन गावंडे, आकाश जसनपुरे, मामनकार, अमोल दारोकर, अरविंद इंगळे, सूरज साळुंखे, अभिजित लासुरकर, भारत पोहोरकार,भूषण जावनजळ, योगेश परघरमोर, जय पोहोरकार, अजय पोहोरकार, सागर तायडे, नितीन पोहोरकार, सचिन पोहोरकार, करण पोहोरकार, अमित घोडेस्वार, संघर्ष वानखडे, श्यामल पवार, गणेश सासनकार, सोहेल कुरेशी, गौरव तळोकार सह वरील नमूद सर्व मंडळी उपस्थिती होती.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button