बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

खामगाव मध्ये एक प्रयोग करूया का ?

उत्सव उत्सवासारखे आणि उत्सवाच्या उद्देशासारखे व्हावे
( जी.डी रोकडे जिल्हा प्रतिनिधी)
खामगाव : खामगावत दरवर्षी अनेक उत्सव साजरे केले जातात त्यातच गणपती उत्सव, जगदंबा देवी उत्सव मोठया प्रमाणात साजरे केले जातात सोबतच अनेक महापुरुषांच्या जयंत्या सुद्धा साजऱ्या केल्या जातात आणि त्या केल्याच पाहिजे. उत्सव जनतेच्या एकत्रीकरण, विचारांची देवाण घेवाण, आपल्या राज्यामधल्या सांस्कृतिक घडामोडीचे प्रतीक, आपल्या भागातील कलाकारांचे कौशल्य दाखवण्याचे एक माध्यम आहे तसेच महापुरुषाच्या जयंती साजरी करणे हे समाजातील लहान मुलांना आपल्या समाजातील महापुरुषांच्या इतिहासाचा उजाळा व्हावा व त्यांनी केलेले कर्तव्य हे संपूर्ण देशवासीयांसाठी कसे ठरले याचा प्रत्यय दिसावा करिता त्यांना प्रत्येक वेळी नमन करावे व आपल्या मुलांमध्ये चांगले संस्कार घडावे त्याकरिता साजरे करावे असे अपेक्षित असते.
आजपर्यंत असे उत्सव व जयंत्या साजऱ्या करण्याकरिता गोड मधुर आवाजातील वाद्य, संगीत, मैदानी, शारीरिक खेळ कलाकृती, रोशनी या विविध सामुग्रीच्या माध्यमातून उत्सव साजरे केले जात होते त्या उत्सवातून मुलांमध्ये संस्कार घडत होते व विद्वत्तता वाढत होती. आज सुद्धा प्रत्येक मुलांच्या आई-वडिलांच्या अपेक्षा ह्याच असतात की आपले मुलं संस्कारी व विद्वान झाली पाहिजे त्याकरता ते अनेक ठिकाणी त्यांच्यावर खर्च करतात वेळ देतात. म्हणून आज रोजी मला हा एकच प्रश्न सर्वांना विचारायचा आहे की आपल्या मुलांबद्दल तेच विचार आपले सुद्धा आहेत का? अगर हो असेल तर आपण आपल्या खामगाव मध्ये एक प्रयोग सर्वांमिळून करावा का?
आज आपण पाहतो उत्सव झाल्यानंतर काही दिवस अनेक ठिकाणच्या बातम्या प्रसिद्धी माध्यमातून येतात की उत्सवात लेझर लाईटचा उपयोग केल्यामुळे अनेकांच्या डोळ्यांना इजा झाली, डीजेच्या कर्कश्य आवाजामुळे अनेक मुलांच्या कानाच्या पडद्याला इजा होऊन ते बधीर झाले. हेच का उत्सवाचे पडसाद, अनेक ठिकाणी या वाद्यांचा उपयोग केल्यामुळे दंगली सुद्धा घडल्या, जातिवाद सुद्धा निर्माण झाला त्यामध्ये अनेक आपले शिक्षण घेणारे बंधू – मुले होरपडल्या गेले, अनेक परिवार उध्वस्त झाले. या सर्व नुकसानदायक गोष्टींना आपण आळा घालावा का ? अगर हो असेल तर आपल्या मंडळांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन पोलीस विभागाकडे अशा प्रकारचे मंडळातर्फे आपण यावर्षीचा उत्सव संस्कारी व समाजातील उभयंत्याला ज्ञान पुरवणारा कसा ठरणार आहे त्याकरिता मंडळाच्या सदस्यांची बैठक घेऊन आम्ही हा निर्णय घेतला असल्याचे पत्र दिले आणि त्याच पद्धतीने उत्सव साजरा केला गेला तर निश्चितच प्रशासनातील वेगवेगळ्या विभागातर्फे, सामाजिक संघटनांतर्फे सन्मान सत्कार केला जाईल व आपण आपल्या परिवाराला कोणतीही बाधा न पोहचवता संस्कारी जीवन जगण्याचा भविष्यातील संदेश दिला असल्याचे समाधान मिळेल असे मला वाटते.
तर यामध्ये कोणालाही श्रेय न देता आपण आपले श्रेय आपल्याच मंडळातील सदस्यांनी घेऊन समोर यावे व खामगावकरांचा हा प्रयोग राज्यातच नव्हे तर देशात प्रचलित व्हावा हीच अपेक्षा…..✒️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button