दोन वर्षापासून लग्नाच्या आमिषान दाखवून कुमारीवर वारंवार लैगिंक शोषणाप्रकरणी युवकावर गुन्हा दाखल

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहूरकर
शेगांव- प्रेमाचे नाते जुळवित लग्न करतो असे आमिष दाखवित युवकाने एका कुमारिकेसोबत वारंवार लॉजवर नेवून तिचे लैंगिक शोषण केल्याची घटना उघडकीस आली आहे.
या प्रकरणी अकोला जिल्हयातील कळमेश्वर येथील कृष्णा शंकर कदम 24 या युवकाने गावातील एका विस
वर्षीय युवतीसोबत प्रेमाचे नाते जुळविले होते हे मागील दोन वर्षापासून त्याच्यात प्रेम संबध होते. दरम्यान कृष्णा याने सदर मुलीस लग्नाचे आमिष देवून शेगाव येथे लॉजवर नेत वारंवार तिचे ईच्छेविरुध्द शारिरिक सबंध प्रस्थापित केले. तसेच त्याने त्याच्या मोबाईलमध्ये असलेले मुलीचे फोटो व्हायरल करण्याची
धमकी त्या मुलीला दिलेली आहे. याबाबत पिडीत मुलीने येथील शहर पोस्टला तक्रार दिली असून त्यावर शहर पोलीसांनी कृष्णा शंकर कदम याचे विरुध्द कलम 376, (2) (एन) 417, 506 भांदवि तसेच अॅट्रासिटी अॅक्ट अनुसार गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी पोलीस तपास करीत आहेत.



