मुलीला पळवून नेणाऱ्याची तक्रार आईने केली

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहूरकर
जळगाव जामोद स्थानिक शहरानजीकच असलेल्या वाडी
येथील पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीला शेंदला तालुका मेहकर येथील आरोपी सोनु भवरलाल पवार याने ५ डिसेंबर रोजी पळवून नेले असल्याची तक्रार ८ डिसेंबर रोजी अल्पवयीन मुलीच्या आईने दिली आहे.
जळगाव पोलीस स्टेशनला मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांना चार अपत्य आहेत. त्यापैकी सर्वात लहान असलेली मुलगी तिचे वय पंधरा वर्षे चार महिने चार दिवस असून त्यापैकी क्रमांक तीनची मुलगी सहाव्या वर्गापर्यंत शिकली असून सध्या ती घरकाम करते. सदर मुलगी घटनेच्या दिवशी दुपारी एक वाजता भाजीपाला आणण्याकरिता घरून निघून गेली. परंतु बराच वेळ परत न आल्याने तिचा शोध घेतला असता ती कुठेच मिळून आली नाही. त्यानंतर रात्री उशिरा पळवून नेलेल्या मुलीचा बहिणीच्या मोबाईलवर कॉल आला व मला सोनू भवरलाल पवार, राहणार शेंदला तालुका मेहकर याने येथे आणले आहे. असे म्हटले. त्यावरुन सदर अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून नेले असल्याची तक्रार अल्पवयीन मुलीची आई वय ५२ वर्षे यांनी दिली असून पोलिसांनी भारतीय दंड संहिता १८६० चे ३६३ कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे, पुढील तपास जळगाव जामोद पोलीस करीत आहेत.



