बुलढाणामहाराष्ट्र

खडकपूर्णा प्रकल्पावरून उपसा सिंचन योजनेअंतर्गत सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून द्याराष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करत तहसीलदारांना निवेदन

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

देऊळगावराजा : तालुक्यातील संत चोखासागर खडकपूर्णा प्रकल्पावरून उपसा सिंचन योजनेअंतर्गत मौजी गिरोली, तुळजापूर, गोळेगाव, निमखेड शिवारातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.
राष्ट्रवादीने दिलेल्या निवेदनात नमूद आहे की,बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा येथील खडकपुर्णा प्रकल्पातील पाणी सिंचनासाठी मिळावे म्हणून देऊळगावराजा तालुक्यातील मौजे गीरोली,
निमखेड,तुळजापूर,गोळेगाव परिसरातील शेतकऱ्यांची शासनाकडे अनेक वर्षापासून मागणी आहे. या भागात खरिपातील कपाशी,
सोयाबीन,मका,मिरची,फळ भाजीपाला,बीज प्रक्रिया शेडनेट मध्ये मुख्य पिके तर रब्बीमध्ये गहू,हरभरा,टोमॅटो सह इतर हंगामी स्वरूपाची वेगवेगळे पिके घेतली जातात परंतु सदर पिकांना वेळेवर मुबलक पाणी मिळत नाही म्हणून उत्पन्नावर परिणाम होत असल्याने बँकांकडून घेतलेलं कर्जाचा वेळेत भरणा करता येत नाही तर मुलांचे शिक्षण व लग्नासाठी कर्ज घ्यावे लागते सदर कर्जाची परतफेड करता येत नसल्याने जमिनी विकण्याची वेळ आल्यामुळे शेतकरी नैराश्यातून आत्महत्येस प्रवृत्त होत आर्थिक डबघाईस आला आहे. म्हणून खडकपूर्णा प्रकल्पाच्या जल साठ्यातून या परिसरातील शेतकर्यांच्या शेतीला सिंचनासाठी उपसा सिंचन वा कालव्याने पाणी मिळाल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन आर्थिक प्रगती साधून जीवनमान उंचावण्यास मदत होईल,यासाठी खडक पूर्णा धरणातून स्वतंत्र उपसा सिंचन योजना मंजूर करणे अत्यावश्यक आहे. म्हणून तत्काळ सर्वेक्षण करून, खडकपूर्णा प्रकल्पाजवळील 7/8 किमी अंतरावरील मौजे गिरोली,निमखेड,तुळजापूर, गोळेगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी सिंचनाखाली आणण्यासाठी स्वतंत्र उपसा सिंचन योजना मंजुर करावी.
शासनाच्या 16 एप्रिल 2026 च्या पत्रानुसार प्रस्तावित कलवा शेती सिंचनाच्या नियोजनातून 2092 हेक्टर क्षेत्र वगळल्यामुळे बचत होणाऱ्या पाण्यातून स्वतंत्र उपसा सिंचन योजनेद्वारे गिरोली, तुळजापूर, गोळेगाव, निमखेड परिसरातील क्षेत्र सिंचनाखाली येऊ शकते. त्यामुळे शासनाने तात्काळ सर्वेक्षण करून संबंधित शेतकऱ्यांना न्याय द्यावा.अन्यथा जन आंदोलन उभारू.. असं वक्तव्य तालुका अध्यक्ष राजेश इंगळे यांनी केला
यावेळी उपस्थितीत निवेदन देताना
राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे, प. स. माजी उपसभापती सुधाकर मस्के,खविस चे संचालक शिवाजीराव कोल्हे, बाजार समितीचे संचालक नारायण कोल्हे, काकासाहेब म्हस्के, काकासाहेब कव्हळे,कौतिकराव मस्के, तेजराव मस्के, शेषराव कोल्हे, संजय खरात, विठ्ठल बंगाळे आदींनी केली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button