खंडित वीजपुरवठ्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक उकाड्याने त्रस्तस्टार भारत लाईव्हप्रतिनिधी शेगावसुभाष वाकोडे

कनारखेड :शेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात दुपारी एक पासूनच विंज खंडित करण्यात येत आहे उन्हाळ्यात तब्बल दोन तिन तास बत्ती गुल झाल्याने नागरिक उकाड्याने त्रस्त झाले.
कनारखेड गायगाव लासुरा चिंचोली आदी परिसरांत अचानक वीजपुरवठा खंडित करण्याचा महावितरणने सपाटा लावलेला आहे एकीकडे उन्हाचा पारा वाढत आहे. घरात प्रचंड उकाडा बाहेर उष्णतेचे तापमान
अशा वातावरणातच त्यामध्ये शाळेला लागलेल्या सुट्ट्या लहान मुले उष्ण तापमान मुळे बाहेरी निघू शकत नाही आणि घरातही थांबता येत नाही अशी परिस्थितीमध्ये , महावितरणच्या अधिकारी कर्मचाऱ्याकडून प्रतिसाद मिळत नाही महावितरण ला फोन लागल्यास लवकरच सुरू करू असे उत्तर देऊन मोकळे होतात परिस्थितीमध्ये नागरिकांनी अशा परिस्थितीमध्ये नागरिकांनी कुणाकडे मागणी करायची?
@ मागील आठ दिवसापासून महावितरण कडून दिवसातून दुपारी एक ते चार च्या दरम्यान वीस पुरवठा खंडित करण्याचे काम सुरू असून नागरिकांना महिला व मुलांना वाढाता तापमानामुळे त्रस्त झाले आहेत याकडे महावितरण वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन विज पुरवठा सुरळीत करण्यात यावा अशी मागणी केली आहे ग्राहकाकडून वीज बिल भरण्यास विलंब झाल्यास महावितरणचे कर्मचारी थोडाही विलंब न लावता विद्युत पुरवठा खंडित करतात मात्र ग्राहकांना सुविधा देताना उडवा उडवी चे उत्तरे दिली जातात
आनंद जंवजाळ लासुरा



