हर घर तिरंगा’ अभियानाच्या तयारीला वेग; संग्रामपूर मंडळाची नियोजन बैठक उत्साहात संपन्न…..!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद
संग्रामपूर:- ६ ऑगस्ट २०२६
९ ते १५ ऑगस्टदरम्यान घराघरांत तिरंगा फडकविण्याचे आवाहन वरवट बकाल येथे भाजप पदाधिकारी, महिला व युवा मोर्चा कार्यकर्त्यांची उपस्थिती देशभर ९ ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी भारतीय जनता पार्टी, संग्रामपूर मंडळाच्या वतीने गुरुवारी (दि. ६ ऑगस्ट) वरवट बकाल येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत अभियान प्रभावीपणे राबविण्यासंदर्भात सविस्तर चर्चा करून विविध जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले. बैठकीत प्रत्येक गावात जनजागृती, घराघरांत तिरंगा पोहोचविणे, नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढविणे तसेच स्वातंत्र्यदिन उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी आवश्यक नियोजन करण्यात आले. राष्ट्रभक्तीची भावना अधिक दृढ व्हावी आणि प्रत्येक नागरिकाने अभिमानाने आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकवावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
यावेळी तालुकाध्यक्ष भाऊराव पाटील यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन केले. त्यांनी प्रत्येक गावात व्यापक जनसंपर्क करून ‘हर घर तिरंगा’ अभियान लोकचळवळ बनविण्याचे आवाहन केले. या बैठकीला जिल्हा पदाधिकारी, मंडळ पदाधिकारी, शक्तिकेंद्र प्रमुख, सरचिटणीस, महिला मोर्चा, युवा मोर्चा पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीत अभियानाच्या अचूक नियोजनासह विविध उपक्रमांवर चर्चा करून तयारीला अंतिम स्वरूप देण्यात आले……✍️



