प्रहार अपंग क्रांती चे तहसीलदार यांना निवेदन

*शेगांव* – प्रहार अपंग क्रांतीच्या वतीने 18.1.2023 रोजी कार्यालयासमोर करण्यात आले होते.लेखी स्वरुपात सूचना दिली होती परंतु मा. नायब तहसीलदार साहेब यांनी आपल्या सगिनिशी लेखी स्वरूपात दिलेल्या प्रती दिल्या व उपोषणाला बसता आपण आपल्या मागण्या सनदशीर व शांततेच्या मार्गाने सोडवाव्या व आंदोलनाचा मार्ग अवलंब करण्यात येऊ नये.अशी विनंती तहसीलदार साहेब यांनी प्रहार अपंग क्रांती संघटनेला केली होती.मनून अपंग क्रांतीने आंदोलन मागे घेतले.03/02/2023 वार शुक्रवार रोजी तहसील कार्यालय पुरवठा विभाग येथे अंतोदय शिधापत्रिका साठी विभागणी केली असता श्रीमान एन. बी. बोराडे, व्ही. डब्ल्यू भागवत साहेब व सहकरमचारी पांडे साहेब यांनी 300 ते 350 अर्ज प्राप्त आहे आम्ही आमचा अहवाल तहसिल दार साहेबांनी पाठून तुम्हाला ते देता येत नाही. तहसीलदार यांच्या कार्यालयात जाऊन विचारपूस करण्यात यावी. आमच्या कडे वेळ नाही ..ज्या मार्गाने शिधापत्रिका प्राप्त करण्यात येणार तसे करावे.पुरवठा निरीक्षक व सह कर्मचारी दिव्यांगा सोबत अशा प्रकारची वर्तणूक करतात व उजवा उडवीचे उत्तरे देतात. ज्या शिधापत्रिका 2017-18 -19 पासून देण्यात आलेल्या आहेत. त्या मध्ये सुधा दिव्यागाना प्राधान्य देण्यात आलेले नाही. संबंधितांना लेखी देऊन सुद्धा अद्याप कुटलीही कारवाई करण्यात आलेली नाही.ग्रामीण व शहरी असा भेदभाव दिव्यांगासोबत होत आहे. गहाळ फाटलेल्या दुय्यम शिधापत्रिका,नाव वाढवणे,नाव कमी करणे, ऑनलाइन करणे.यासाठी महिने कालावधी लागत आहे. कार्यालयीन वेळेत गेले असता सुद्धा गैरहजर असतात.असा हलगर्जीपणा सद्या पुरवठा विभाागात सुरू आहे. आपल्या कार्यालयाचे पत्र मिळून सुद्धा अधिकारी पत्राची उल्लंघन करून शिस्तता भंग करीत आहेत. अशा अधिकाऱ्यांवर आपल्या स्तरावर योग्य ती कारवाई करून दिव्यांगांना न्याय देण्याचे करावे. अपंग कायदा 2016 नुसार यांच्यावर कारवाई करून दिव्यांगांना न्याय देण्याचे करावे. 17 जुलै2013 तसेच 21 डिसेंबर 2020 अंतोदय योजनेत समाविष्ट करून स्वातंत्र्य पिवळी शिधापत्रिका देऊन लाभ द्यावा.दिलेल्या पत्रानुसार पंधरा दिवसांचा कालावधी निघून गेल्यावर सुद्धा अशा प्रकारच्या सूचना देऊन सुद्धा आपल्या कार्यालयातील अध्यापर्यंत कुठलीही कार्यवाही झालेली नाही. आम्ही प्रहार अपंग क्रांती संस्था शेगाव शहर व तालुक्याच्या वतीने 07/02/2023 वार मंगळवारपासून मागण्या मंजूर होईपर्यंत तहसील कार्यालय समोर समस्त दिव्यांग बांधव व भगिनी उपोषणासाठी बसणार आहोत.याची नोंद घ्यावी व होणाऱ्या परिणामास आपल्या कार्यालय संबंधित अधिकारी जबाबदार राहील याची नोंद घ्यावी.असा इशारा प्रहार अपंग क्रांतीसंस्थेच्या वतीने देण्यात आला. असे सहीनिशी निवेदन देताना राजेश दांदळे शेख आरिफ शेख फरीद, सुनील सुरवाडे, जफर हुसेन, सय्यद जफर सय्यद अक्सर इत्यादी अपंग क्रांतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
स्टा र भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे




