बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

भोपळे विद्यालयातील तीन खेळाडू राज्यस्तरावर

संतोष गिऱ्हेस्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी माळेगाव बाजार

महाराष्ट्र शासनाच्या युवक व क्रीडा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, यवतमाळ व्दारा आयोजित अमरावती विभागीय मैदानी क्रीडा स्पर्धेत हिवरखेड येथील सहदेवराव भोपळे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांनी चार सुवर्ण पदके मिळवीत प्रथम क्रमांक प्राप्त करून राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत स्थान निश्चित केले आहे. यात रेणुका संतोषकुमार राऊत हिने १९ वर्षाखालील मुलींच्या गटातून हॅमर थ्रो क्रीडा प्रकारात अपूर्व आत्मविश्वास आणि कौशल्य दाखवत प्रथम क्रमांक मिळविला आहे. तसेच १७ वर्षाखालील मुलांच्या मुलांच्या गटातून रामेश्वर देवानंद अरबे या गुणवंत खेळाडूने उंच उडी आणि तिहेरी उडी या दोन्ही प्रकारात दुहेरी प्रथम क्रमांक मिळवून अभूतपूर्व कामगिरी केली आहे. प्रेमकुमार नंदकिशोर नागपुरे याने प्रभावी प्रदर्शन करीत १९ वर्षाखालील मुलांच्या गटातून तिहेरी उडी या प्रकारात प्रथम स्थान पटकावले आहे. तसेच ३६ व्या सब जुनिअर राज्य अजिंक्य पद अकोला ग्रामीण जिल्हा संघात पियुष वासुदेव गावंडे ह्याची निवड झाल्याने क्रीडा यशात भर पडली आहे. महात्मा फुले शिक्षण संस्थेचे कार्यवाह श्यामशील भोपळे यांच्या प्रेरणेने व प्रोत्साहनातून विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. या यशाबद्दल महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिलकुमार भोपळे यांच्यासह संस्थेचे समस्त पदाधिकारी व संचालकगण यांनी खेळाडू, त्यांचे पालक व मार्गदर्शक शिक्षक-शिक्षिका यांचे अभिनंदन केले आहे. तसेच विभाग प्रमुख स्नेहल भोपळे, प्राचार्य तथा क्रीडा शिक्षक संतोषकुमार राऊत, पर्यवेक्षक गणेश खानझोडे यांनी क्रीडा प्रशिक्षक अक्षय मोरखडे व माजी विद्यार्थी संघातील खेळाडू विद्यार्थी यांच्या अविरत मार्गदर्शनामुळे व विद्यार्थ्यांच्या मेहनत, जिद्द व चिकाटीने हे यश मिळाले असल्याचे मत प्रतिपादन केले. या यशामुळे शाळेचा क्रीडा क्षेत्रातील नावलौकिक वाढला आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button