ब्रेकिंग न्यूज ,अकोला जिल्ह्याचे खा. मा.अनुपजी धोत्रे यांनी श्रीराम नवमी निमित्त अकोला व विदर्भातील जनतेसाठी दिली आनंदाची बातमी.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस अकोला जिल्हा प्रतिनिधी विजय घोडे
दि.२६ मार्च /
अकोला ते तिरुपती दरम्यान विशेष रेल्वेगाडीचे नियमितीकरण करण्याबाबत केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असल्याची माहिती समोर येत आहे यासंदर्भात रेल्वेमंत्री माननीय अश्विनी वैष्णव यांचे पत्र प्राप्त झाले असून, अकोला-तिरुपती स्पेशल गाडी (07606/07605) आता नियमित स्वरूपात 17430/17429 अकोला-तिरुपती एक्सप्रेस म्हणून धावणार आहे.
ही गाडी सुरू झाल्यामुळे विदर्भातील भाविकांना तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी मोठी सोय होणार असून प्रवास अधिक सुलभ आणि सोयीस्कर होईल. अशी चर्चा जनसामान्यात वर्तवण्यात येत आहे
या निर्णयाबद्दल माननीय रेल्वेमंत्री मा.अश्विनी वैष्णव यांचे अकोला जिल्ह्याचे खा. माननीय अनुप भाऊ धोत्रे यांनी मनःपूर्वक आभार सुद्धा याप्रसंगी मानले असल्याचे चित्र समोर येत आहे



