खानदेशजळगावा जिल्हाराजकीय

जिल्हा क्रीडा संकुल सुरक्षा रक्षक घोटाळ्याप्रकरणी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना कायदेशीर नोटीस

मुक्ताईनगर प्रतिनिधी:-

छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे कंत्राटी सुरक्षारक्षकांची आर्थिक ,शारीरिक पिडवणूक होत असून जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारीनंतरही सुरक्षा रक्षकांना न्याय न मिळाल्याने संभाजीनगर येथील उच्च न्यायालयातील एडवोकेट अमोल साळोक त्यांच्यामार्फत कायदेशीर नोटीस देण्यात आलेली असून तरीही कंत्राटी सुरक्षा रक्षकांना आर्थिक न्याय न मिळाल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ.विवेक सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे कंत्राटी स्वरूपावर चार-चार अशा तीन शिफ्ट मध्ये बारा सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. परंतु सदर सुरक्षा रक्षकांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन मिळत नसून आजतागायत सुरक्षा रक्षकांना वेतन चिठ्ठी देण्यात आलेली नाही तसेच संबंधित सुरक्षारक्षकांना वेतनानुसार पीएफ, ईएसआय सुद्धा देण्यात येत नसून शास सदर सुरक्षा रक्षकाच्या अनुषंगाने शासनाचा व्यवसाय कर व जीएसटी सुद्धा बुडवला जात आहे. करारानुसार सुरक्षारक्षकांना आठ तास ड्युटी करणे बंधनकारक असताना कंत्राटदार सुरक्षा रक्षकांना बारा बारा तास ड्युटी करून घेत आहे. संबंधित माहिती ही माहिती अधिकार अर्जात उघड झालेली आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तसेच जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडे मागील एक वर्षापासून सातत्याने वारंवार तक्रारी करू नये सुरक्षारक्षकांची आर्थिक लूट थांबत नसल्याने जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांची सदर ठेकेदारासोबत आर्थिक भागीदारी सिद्ध होत आहे त्यामुळे कंत्राटदाराच्या या भ्रष्ट व भोंगळ कारभारावर जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडून डोळेझाकपणे आर्थिक पांघरून घातले जात आहे. त्यामुळे सुरक्षारक्षकांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयातील एडवोकेट अमोल साळोक यांच्यामार्फत कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. परंतु तरीही सुरक्षारक्षकांना आर्थिक न्याय न मिळाल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.विवेक सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button