महाराष्ट्रविदर्भ

वाशिमचे जिल्हा परिषदचे जिल्हा मुख्याधिकारी वैभव वाघमारे यांची बदली झाल्यास तीव्र आंदोलन करणार – जगदीश मानवतकर.

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

वाशिम : – स्थानिक वाशिम येथील बहुजन भारत पार्टी आणि ऑल इंडिया ब्लू टायगर सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम मार्फत मुख्यमंत्र्यांनानिवेदन देण्यात आले . या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की , वाशिम जिल्हा परिषदच्या काही कर्मचारी संघटना या वाशिमचे जिल्हा मुख्यअधिकारी आय. ए .एस सनदी अधिकारी वैभव वाघमारे यांच्या विरोधात 1 तारखेपासून संपावर जात आहे . म्हणून अशा या कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय अधिकारी वाशिम मधून न जावा याकरिता आज रोजी बहुजन भारत पार्टी आणि ऑल इंडिया ब्लू टायगर सेना यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. त्या अगोदर सर्व संघटना ज्यामध्ये शिव – लहू फुले शाहू आंबेडकर साठे यांच्या विचारसरणीवर काम करणारे पक्ष आणि संघटना यांनी जिल्हाधिकारी कार्यालय यांना निवेदन दिले . या वेळी वाशिम मधील जवळपास 75 संघटना आणि त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यानंतर बहुजन भारत पार्टी आणि ऑल इंडिया ब्लू टायगर सेना यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय वाशीम यांना निवेदन देण्यात आले . या निवेदनात असे नमूद केले आहे की , वाशिमचे जिल्हामुख्य अधिकारी सी.ओ वैभव वाघमारे साहेब हे गेल्या फेब्रुवारी 2024 पासून वाशिम मध्ये आपले कर्तव्य बजावत आहेत. या कर्तव्यात त्यांनी अनेक कामे मार्गी लावली ,अनेक कामचुकार आणि बेशिस्त अधिकाऱ्यांना त्यांनी शिस्त लावली ,अनेक जिल्हा परिषद शाळा जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत , पंचायत समिती आणि इतरही शासकीय कार्यालय यांच्यावर त्यांनी आपला शिस्तप्रिय आणि कर्तव्यदक्ष पणाचा शिक्का उमटवला . वाशिम मधील अनेक जिल्हा परिषद शिक्षकांना जे शिक्षक वेळेवर शाळेत येत नाहीत, वेळेवर येऊन शिकवीत नाहीत , सतत गैरहजर राहतात अशा अनेक शिक्षकांना त्यांनी कामातून निलंबित केले आहे . काही महिने अगोदर त्यांनी वाशिम जिल्हा परिषद चे गेट बंद केले होते,l जेणेकरून उशिरा कोणीही अधिकारी येणार नाही असे अनेक विकासाचे कामे वाशिम जिल्ह्यात होत असताना कामचुकार आणि बेशिस्त कर्मचारी हे संपावर जात आहेत . अशा या कर्तव्यदक्ष , पारदर्शकता आणि शिस्तप्रिय असणारा शासकीय कर्मचारी आपल्या वाशिम मधून गमवायची वेळ येईल म्हणून ऑल इंडिया ब्लू टायगर सेना आणि बहुजन भारत पार्टी वाशिम मध्ये आक्रमक झाली आहे . त्या अनुषंगाने वाशिम मधील जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत मुख्यमंत्र्यांना लेखी निवेदन देण्यात आले. या निवेदनात असे नमूद केले की, अशा प्रकारचा कर्मचारी आमच्या वाशिम जिल्ह्याला हवा आहे . त्यामुळे आपण शासकीय कर्मचाऱ्यांच्या दबावाला नु जुमानता हे अधिकारी वाशिम जिल्ह्यात ठेवावे . म्हणून वाशिम जिल्ह्यात विकासाची कामे होतील , अशा आशयाचे निवेदन यावेळी देण्यात आले. यावेळी बहुजन भारत पार्टीचे राज्यसचिव तथा विदर्भ प्रभारी विधानसभा जगदीश मानवतकर सर , वाशिम जिल्हा प्रमुख अरुण भाऊ शेळके पाटील, जिल्हा उपाध्यक्ष संजय पुंडसे, जिल्हा सचिव अक्षय भाऊ इंगोले, जिल्हा महासचिव रामदासजी कालापाड , जिल्हा शहर अध्यक्ष रविभाऊ ठोके , शहर उपाध्यक्ष गौतम भाऊ कंकाळ, वाशिम जिल्हा प्रमुख ( महिला ) वंदनाताई भगत , जिल्हा उपाध्यक्ष खडसेबाई , वाशिम तालुका अध्यक्ष नितीन बांगर, तालुका उपाध्यक्ष खडसे यांच्यासह ऑल इंडिया ब्लू टायगर सेनेचे विदर्भ संपर्क संविधान भाऊ ढोले, वाशिम जिल्हा अध्यक्ष मुकेश ताजने यांच्यासह बहुजन भारत पार्टी , ऑल इंडिया ब्लू टायगर सेना आणि जगदीश मानवतकर समर्थक बहुसंख्येने उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button