जळगावा जिल्हासामाजिकसांस्कृतिक

रोझोदा यात्रेत डॉक्टर केतकी पाटील सहभागी रावेर,

जळगाव जिल्हा प्रतिनिधी

तालुक्यातील रोझोदा येथे तीर्थक्षेत्र श्री.कामसिध्द देवस्थान च्या यात्रेत 24 रोजी भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा उपाध्यक्ष डॉक्टर केतकी पाटील सहभागी झाल्या.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रोझोदा येथे मंदिराची यात्रा भरलेली आहे. डॉक्टर केतकी पाटील यांनी रोझोदा गावी जाऊन गावातून निघालेल्या देवकाठीच्या पदयात्रेत सहभागी होऊन दर्शन घेतले. या शोभायात्रेत बालक, युवावर्ग, ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला होता.
या प्रसंगी कामसिद्ध मंदिरात देवस्थान समितीतर्फे डॉ केतकी पाटील यांचे स्वागत करणयात आले. यावेळी देवस्थानाच्या पदाधिकाऱ्यांसोबत
आणि उपस्थित भाविक भक्तांसोबतही डॉक्टर केतकी पाटील यांनी संवाद साधला.
यावेळी मंदिर विश्वस्त कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष विजय महाजन उपाध्यक्ष टेनुदास यादव फेगडे,सचिव वसंत बोंडे, रमेश महाजन,मिलिंद वायकोळे, गीत वायकोळे, शंतनू फेगडे,भूषण राणे हार्दिक वायकोळे आणि भाविक भक्त उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button