शेगाव रेल्वेस्थानकावर महत्वाच्या गाड्यांना थांबा द्या – मागणी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहूरकर
शेगाव स्थानिक रेल्वेस्थानकावर अनेक महत्वाच्या गाड्धाना थांबा नत्तत्याच्या पाश्र्वभूमीवर शेगाव प्रवासी संघटनेच्यावतीने ६ जानेवारी रोजी भुसावळ येथील कार्यालयात डीआरएम भुसावळ पुनीत अग्रवाल यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर चर्चा केली यावेळी किमान महत्वाच्या गाड्यांना तरी थांबा देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली
यावेळी संघटनेने ठळकपणे निदर्शनास आणून दिले की, सध्या शेगाव येथे धांबत नसलेल्या १५ पेक्षा अधिक गाड्या जात असल्या तरी त्यांना शेगाव स्थानकावर थोबा
नाही. यामध्ये अनेक नियमित एक्सप्रेस गाड्यांचा समावेश अत्तून या गाड्यांना शेगावपेक्षा कमी दर्जाच्या, कमी प्रवासी संख्या व कमी महसूल असलेल्या स्थानकांवर थांबे दिलेले आहेत.
तरी हैदराबाद-जयपूर
एक्सप्रेस, बल्लारशाह मुंबई एक्सप्रेस, काविगुडा-भगत की कोठी (जोधपुर। एक्सप्रेस, उधना-ब्रह्मपूर अमृत भारत एक्सप्रेस, चेन्नई-भगत की कोठी एक्सप्रेस, पुरी-अहमदाबाद एक्सप्रेस, याशिवाय, याखेरीजही ९० पेक्षा
अधिक गाड्यांना शेगाववर थांबा नाही, हेही डीआरएम यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. पूर्वी तालगड नावाने धावणारी व तथ्थ्य काचिगुडा-बीकानेर म्हणून सुरू असलेली गाडी मार्ग बदलल्यानंतर अचानक शेगावचा थांबा काढून टाकण्यात आला आहे शेगाव हे महाराष्ट्रातील एक प्रमुख तीर्थक्षेत्र असून येथे श्री गजानन महाराजांचे समाधी मंदिर आहे. दरवर्षी देश-विदेशातून लाखो भाविक वेथे येतात. शेगाव स्टेशन हे एमएससी-२ दर्जाचे असून वार्षिक सुमारे ५० कोटींचा महसूल रेल्वेला देते आणि दररोज २० हजार पेक्षा अधिक प्रवाशांची वर्दळ असते.
विशेष म्हणजे यावर्षी १ जानेवारी रोजीच २.५ लाखांहून अधिक भाविकानी शेगावला भेट दिली होती बुलढाणा जिल्ह्यासह अकोला जिल्ह्यातील अनेक तालुक्यांसाठी शेगाव हे प्रमुख रेल्वे केंद्र आहे.
येणान्या काळात नाशिक येथे कुंभमेळा होणार असल्यामुळे भाविकांची मोठ्या प्रमाणावर ये-जा अपेक्षित आहे त्यामुळे शेगाव येथेही भाविकांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे. सर्व प्रवासी गाड्यांना शेगाव येथे थांबा देणे अत्यावश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी अॅड. पुरुषोत्तन डांगरा, अॅड. मनोज जैन, वरुण नागपाल बञ्जय ग्वालागी उपस्थित होते.



