महाराष्ट्रविदर्भसामाजिक

मलकापुर विधानसभा मतदार संघाचा विकास करण्यासाठी आमदार राजेश भाऊ एकडे कटिबद्द

मलकापुर विधानसभा मतदार संघाचा विकास करण्यासाठी आमदार राजेश भाऊ एकडे कटिबद्द
स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे

मलकापूर:- जनहिताच्या समस्या सोडविण्यास आम्ही कटिबद्ध असून आपल्या ज्या काही समस्या असतील त्या आम्हाला आवर्जून सांगा त्या आम्ही प्रामाणिकपणे सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू अशी ग्वाही आमदार राजेश एकडे यांनी लासुरा वासीयांना दिली.
लासुरा येथील पुरातनकालीन शिवनाभी मंदिर व नवनाथ देवस्थान येथे भक्ती निवास बांधकाम भूमीपूजन तथा गौरक्षण महाराज मंदिर सभा मंडप बांधकाम लोकार्पण सोहळा आज २७ ऑक्टोंबर रोजी आमदार राजेश एकडे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी अॅड साहेबराव मोरे, संतोष रायपुरे, हिवाळे गुरुजी, बंडूभाऊ चौधरी, राजुभाऊ पाटील, शिरीष डोरले, बाळूभाऊ पाटील,एस पी संबारे, प्रवीण पाटील, लासुरा सरपंच लताबाई गवई आदी मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती होती.याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात‌ बोलतांना आ.राजेश एकडे म्हणाले की, विकास कामासोबतच माझ्या हातून सर्वसामान्यांची श्रद्धा असलेल्या धार्मिक स्थळांचा सुद्धा विकास केला जात आहे हे मी माझं सौभाग्य समजतो अशी भावना व्यक्त करीत आमदार झाल्यानंतर मी ज्यावेळी लासुरा गावात प्रथमच आलो होतो त्यावेळी मला गावकऱ्यांनी ग्रामस्थांच श्रद्धास्थान असलेलं हे मंदिर दाखवलं व सभा मंडपाची मागणी केली. आज येथे सभा मंडपाचा लोकार्पण सोहळा व भक्त निवास बांधकाम भूमिपूजन सुद्धा पार पडले आहे. एकंदर मलाही काम करण्याची संधी मिळाली आहे असं मी समजतो. त्याचप्रमाणे चार वर्षाच्या कार्यकाळात केलेली विकास कामे मतदार संघातील सर्वसामान्य वर्गाला प्रत्यक्षात दिसतच आहे. तर उमाळी लासुरा व लासुरा मेढळी हे दोन रस्ते मंजूर केले असून लवकरच या रस्त्याचे काम सुरू करण्यात येईल असे आश्वासन दिले. तसेच आपल्या ज्या काही समस्या असतील त्या आम्हाला आवर्जून सांगा आम्ही त्या प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू अशी ग्वाही आमदार राजेश एकडे यांनी दिली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button