बुलढाणामहाराष्ट्रसामाजिक

पालकांनी विवाह जुडवण्यासाठी मानसिकता बदलले गरजेचे – जि. प. अध्यक्षा संगीता अढाऊ

पालकांनी विवाह जुडवण्यासाठी मानसिकता बदलले गरजेचे – जि. प. अध्यक्षा संगीता अढाऊ

[ २९ वे माळी समाज राज्यस्तरीय युवक युवती परिचय महासम्मेलन शेगाव सोयर पुस्तिकेचे विमोचन संपन्न ]

[ दि.७, ८,९ जानेवारी असा तीन दिवस चालणार परिचय मेळावा ]
[ सोयर पुस्तिकेत ८३० युवक तर १०२० युवतींची नोंदणी ]

शेगाव (प्रतिनिधी) :- माळी समाज राज्यस्तरीय युवक युवती परिचय महासम्मेलन शेगाव येथिल २९ वे परिचय महासंमेलन दि. ७, ८, ते ९ जानेवारी असा ३ दिवस चालणाऱ्या या परिचय मेळाव्याचे सोयर पुस्तिकेचा विमोचन सोहळा शनिवार दि.७ जानेवारी रोजी या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.आमदार लक्ष्मणराव तायडे बाळापूर विधानसभा, कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून अकोला जिल्ह्याच्या जि. प. अध्यक्षा संगीताताई अढाऊ, प्रमुख मार्गदर्शक जलंब मतदारसंघांचे मा.आमदार कृष्णराव इंगळे, प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार मा.आमदार बळीरामजी सिरस्कार, डॉ.संतोष हुसे, डॉ. शंकरराव क्षीरसागर, राजू असोलकार, खामगाव चे आमदार मा.आकाश पुंडकर, छगनराव मेहत्रे, सौ. रेणुका सिरस्कार, प्रा.हरिभाऊ इंगळे, श्रीकृष्ण बोळे, प्रा. सदानंद माळी, संजय वानखडे, प्राचार्य दिनेश तायडे, डी. एस. खंडारे, तुकाराम निखाडे, गजानन राऊत, विनोद इंगळे,अध्यक्ष सुरेशभाऊ गिऱ्हे, कार्याध्यक्ष अजय तायडे हे होते. 

दर वर्षी माळी समाज राज्यस्तरीय युवक युवती परिचय महासम्मेलन शेगाव येथील परिचय महासंम्मेलन भव्य मोठया प्रमाणात साजरे करण्यात येते. व त्यावेळी या परिचय सम्मेलनास यात्रेचे स्वरूप प्राप्त होते. मागील वर्षी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव असल्यामुळे कार्यक्रम घेण्याची परवानगी प्रशासनाने दिली नव्हती. त्यामुळे सोयर अँप च्या माध्यमातून ऑनलाईन परिचय घेण्याचा प्रयत्न आयोजन समितीने केला. मात्र या वर्षी मोठया जोमाने परिचय मेळाव्याच्या पहिल्या दिवशी सोयर पुस्तिकेचे विमोचन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करून परिचय मेळाव्यास सुरुवात करण्यात आली. अध्यक्षीय सांभाषणात बोलतांना जि.प. अध्यक्ष संगीता अढाऊ म्हणाल्या की पालकांनी विवाह जुडवण्यासाठी जास्त अपेक्षा न करता योग्य तो जोडीदार निवडावा. त्याकरिता मानसिकता बदलले गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.त्याचं प्रमाणे विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या समाज बांधवांचा सत्कार आयोजन समितीच्या वतीने करण्यात आला.

या वर्षी परिचय मेळाव्याच्या या सोयर पुस्तिकेत जवळपास २००० मूलामुलींची नोंदणी झाली असून त्यात १०२० मुलींची नोंदणी झाली आहे. यातूनच हजारो संबंध दरवर्षी जुळतात यावर्षी सुद्धा आपल्या पसंतीचे स्थळ आपल्याला मिळो असे आयोजन समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे.  या परिचय महासम्मेलनाला मेळाव्याला अनिल गिऱ्हे, नितीन इंगळे, राजेश तायडे, बंडूभाऊ इंगळे, सुशील इंगळे, दिपक रौंदळे, ऍड. श्रीकांत तायडे, प्रा. नितीन देऊळकार, विठ्ठल ढगे, कैलास जामगडे व खामगांव विभागाचे, प्रदीप सातव, राजेंद्र भोपळे, विनायक जुमळे, विजय राखोंडे ,रघुनाथ चोपडे, अविनाश उंबरकर, प्रविण माळी, अरविंद बोचरे, जयेश वावगे या सह समस्त अकोला व खामगाव विभागाचे पदधिकारी व कार्यकर्ते तसेच आयोजन समितीचे सहकार्य मिळाले.मेळाव्याच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्याध्यक्ष अजय तायडे, संचालन प्रदीप सातव तर आभार अनिल गिऱ्हे यांनी मानले. स्टार भारत लाईव्ह प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button