
औरंगाबाद येथे आढळले पातूरच्या वयोवृद्ध इसमाचे प्रेत
पातुर तालुका प्रतिनिधी सुखलाल उपर्वट
मृतकाची ओळख पटविण्यासाठी पातूर पोलिसांचे आवाहन
पातूर : अ
कोला-वाशिम रोडवर पातूरनजीक असलेल्या घाटातील म्हसोबा मंदिरातील पुजारी असलेला कळनू महाराज या वयोवृद्ध इसमाचा मृतदेह औरंगाबाद येथे आढळून आला.
पातूर येथील घाटात असलेल्या म्हसोबा मंदिरात मागील 30 वर्षांपासून कळनु मरजी सरदार हा इसम पुजारी म्हणून राहत होता.दरम्यान काही महिन्यांपूर्वी महामार्गाचे काम सुरू असल्याने सदर मंदिर पाडण्यात आले होते तेंव्हापासून कळनू महाराजाची भटकंती झाली.दरम्यान आज दि.16 जानेवारी 2023 रोजी सकाळी 10:30 वाजता सिडको बस स्टँड,औरंगाबाद येथे बेवारस स्थितीत पडून असलेल्या वयोवृद्ध इसमाचा मृतदेह आढळून आला असता पोलिसांनी पंचनामा केला असता मृतकाजवळ एक बँक पासबुक व आधार कार्ड आढळुन आले.सदर आधारकार्ड वरून मृतक कळनू मरजी सरदार (वय 80) रा.पातूर घाट ता.पातूर जिल्हा अकोला असल्याचे समजल्याने औरंगाबाद पोलिसांनी मृतदेहाच्या नातेवाईकांचा शोध घेणे कमी पातूर पोलिसांना घटनेची माहिती दिली. सदर मृतकाचे नातेवाईक अथवा आप्तेष्ट असल्यास मृतकाची ओळख पटविण्यासाठी तसेच मृतदेह ताब्यात घेणेकामी पातूर पोलिसांशी संपर्क करावा असे आवाहन पातूर पोलिसांनी केले आहे.



