खानदेशमहाराष्ट्र

एकनाथराव खडसे यांच्या ३० ऑगस्टच्या अभीष्टचिंतन सोहळ्याला दिग्गज मान्यवरांचे विविध दौरे प्राप्त; श्रीक्षेत्र कोथळी येथे अखंड हरिनाम सप्ताह सुरू

राज्याचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री, आमदार एकनाथराव खडसे (नाथाभाऊ) यांच्या अमृत महोत्सवी ७५व्या वर्षात पदार्पणानिमित्त श्रीक्षेत्र कोथळी येथील पावन श्री संत मुक्ताई जुने मंदिर परिसरात अध्यात्म, भक्ती आणि वारकरी परंपरेचा अपूर्व सोहळा सुरू आहे. या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या ‘अमृत महोत्सव अखंड हरिनाम सप्ताह, संगीत श्री संत मुक्ताई चरित्र तथा संगीत श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा’ सुरू आहे. या आमदार एकनाथराव खडसे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी कार्यक्रमानिमित्त राज्यभरातून विविध मान्यवरांचे दौरे लागले व प्राप्त झाले असून, आगामी रविवार, दि. ३० ऑगस्ट २०२६ रोजी कोथळी येथे होणाऱ्या वाढदिवसाच्या अभीष्टचिंतन सोहळ्यावर विशेष फोकस करत हा सोहळा दिमाखात पार पडत आहे आणि या मुख्य सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे.

या भव्य सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य श्री. चंद्रकांतदादा पाटील हे दि. २९ ऑगस्ट रोजी सकाळी आमदार एकनाथराव खडसे यांच्या कार्यक्रमाला उपस्थिती देणार आहेत. प्रामुख्याने दि. ३० ऑगस्ट रोजी होणाऱ्या अभीष्टचिंतन सोहळ्यावर लक्ष केंद्रित करून या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री. शरदचंद्र पवार साहेब, भाजपचे राष्ट्रीय महामंत्री श्री. विनोद तावडे, आयुष मंत्रालय केंद्रीय राज्यमंत्री मा.ना.प्रतापराव जाधव, केंद्रीय मंत्री मा.रामदास आठवले, राष्ट्रीय अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी प्रकाश आंबेडकर, शेकापचे अध्यक्ष जयंत पाटील, रासपचे मा. महादेव जानकर, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्हा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, पर्यावरण, पशु संवर्धन, मंत्री पंकजाताई मुंडे, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशअध्यक्ष शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशअध्यक्ष जयंत पाटील, कामगार मंत्री मा. आकाश फुंडकर, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री राजेश टोपे, माजी मंत्री राजेंद्र शिंगणे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी मंत्री अनिल देशमुख, खा. अमोल कोल्हे, खा. निलेश लंके, आमदार चैनसुख संचेती, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि मध्यप्रदेशच्या माजी मंत्री अर्चनाताई चिटणीस हे सर्व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button