महाराष्ट्र

ऑनलाइन ॲडमिशन करिता स्थापन होणार मार्गदर्शक कक्ष ! सिरसोली येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार! गुणवत्ते सोबतच सु- संस्कारही महत्त्वाचे ; सुरेशदादा खोटरे.

विजय म. घोडे अकोला जिल्हा प्रतिनिधी स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

सिरसोली (अकोला) :- शिरसोली येथील स्वर्गीय बाळासाहेब खोटरे विद्यालय व महाविद्यालय येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार नुकताच करण्यात आला . याप्रसंगी विद्यार्थ्यांनी मेहनत करून गुणवत्ता प्राप्त करावी त्याचबरोबर विद्यार्थी दशेत जगत असताना सु-संस्कारही महत्त्वाचे आहेत. असे उद्गार सुरेशदादा खोटरे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना काढले आहेत. स्वर्गीय बाबासाहेब खोटरे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय सिरसोली येथे वर्ग बारावी कला क्षेत्रामधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच वर्ग पाचवी ते अकरावी पर्यंत चा निकाल जाहीर करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्ञानगंगा ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ सिरसोली चे अध्यक्ष सुरेशदादा खोटरे हे होते तर प्रमुख पाहुणे निळकंठ काळे सर, पालक प्रतिनिधी सुनील राऊत व मंगेश माकोने, प्राचार्य मिलिंद खोटरे उपस्थित होते. याप्रसंगी वर्ग बारावी कला मधून सर्वप्रथम क्रमांक असलेली विद्यार्थिनी कु. आचल राजेश माकोने, कु. गौरी पांडुरंग चिकटे (द्वितीय ), कु. समीक्षा विनायक वनकर (तृतीय ) तसेच गणित ऑलिंपियाड मध्ये प्राविण्य प्राप्त विद्यार्थीनी कु. गुंजन भारसाकळे या सर्व विद्यार्थिनींचा सत्कार संस्थाध्यक्ष सुरेशदादा खोटरे यांच्या हस्ते करण्यात आला . कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश तेलगोटे यांनी केले. अध्यक्षीय भाषणामध्ये सुरेशदादा खोटरे यांनी विद्यार्थी जीवनामध्ये शिस्त, मेहनत, आज्ञापालन, अभ्यास याचे महत्त्व सांगितले. याप्रसंगी वर्ग पाचवी ते नववी तसेच अकरावीचा निकाल जाहीर करण्यात आला व गुणपत्रिकांचे वाटपही करण्यात आले. यावर्षी पासून वर्ग अकरावीच्या ऍडमिशन ऑनलाईन होणार असून कनिष्ठ महाविद्यालयामध्ये ऑनलाईन ऍडमिशन संदर्भात मार्गदर्शन करण्यात येईल. यासाठी एक मार्गदर्शक कक्ष स्थापन करण्यात येणार असून वर्ग दहावी च्या निकालानंतर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी कनिष्ठ महाविद्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन प्राचार्यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा.संतोष नहाटे यांनी केले तर आभार प्रमोद आखरे सर यांनी मानले. कार्यक्रमाला जगदेव कात्रे सर,
संगीता डाबेराव मॅडम, योगेश सर, के. एस.सोलकर, गजानन भारसाकडे, नंदाताई गावंडे मॅडम, अंजली खोटरे मॅडम, उमेश तेलगोटे सर, तसेच सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button