नैसर्गिक
बस बस स्टॅन्डच्या आवारातील बंद दुकानाला आग

कार्यवाहीमुळे मोठी दुर्घटना टळली
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहूरकर विदर्भ ब्युरो चिप
शेगाव । आज दुपारी १२ वाजता सुमारास येथील बस स्थानकाच्या आवारातील एका बंद दुकानाला आग लागल्याची घटना घडली. स्थानक प्रशासनाकडून ताबडतोब कार्यवाही झाल्याने मोठी दुर्घटना टळली. घटनेची माहिती मिळताच स्थानक केव व्यवस्थापक शुभांगी पवार व वाहतूक नियंत्रक महेश पाटील यांनी घटनास्थळी पोहोचून तेथील परिस्थितीची पाहणी केली आणि ताबडतोब बंद दुकानाचे कुलूप तोडले व नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या गाडीला पाचारण केले. त्यानंतर काही वेळातच अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचली आणि काही वेळातच आग विझविण्यात आली. मात्र सदर दुकानातील विद्युत मिटर बंद असतानाही कर या दुकानाला आग कशी लागली, हे मात्र कळू शकले नाही.



