ईव्हीएम विरोधातील लढाई, जीवाची बाजी लावुन लढणारा —–मा.वामन मेश्राम..

भारत देशातील ईव्हीएमच्या विरोधातील स्वयंस्पष्ट व आंदोलनाची भुमिका भारतात सर्वप्रथम भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.वामन मेश्राम यांनी २०१३ पासुन घेतली.
मा.मेश्राम साहेबांनी ईव्हीएमच्या विरोधात भारतीय नागरिकांना जागृत करण्यासाठी संपुर्ण भारतात सभा,संमेलने,आंदोलने,परिसंवाद या मार्फत जागर केला.मेश्राम साहेबांनी हाती घेतलेला ईव्हीएमचा विषय आता राष्ट्रीय विषय झालेला आहे.किंबहुना तो विषय राष्ट्रीय पातळीवरचा करायला मेश्राम साहेबांनी भाग पाडलेला आहे.
ईव्हीएम मशीन सोबत जी VVPAT(मतपत्रिका ज्या पेटीत पडते ती पेटी)…. ही मेश्राम साहेबांनी सुप्रिम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेमुळे लागलेल्या आहेत. हे या भारतातील बिकाऊ मिडिया कधीच सांगत नाही….ना कोणता राजकीय पक्ष अथवा त्या पक्षाचे नेते सांगत नाहीत.मेश्राम साहेबांना श्रेय जाऊ नये म्हणुन या सर्वांनी यांना black out केलेले आहे.परंतु सत्य कधी लपवता येत नाही.आज जगासमोर सत्य आले आहे.
मा.वामन मेश्राम साहेब यांनी ईव्हीएमच्या विरोधात दोन वेळा राष्ट्रीय स्तरावर परिवर्तन यात्रा काढल्या.
पहिल्या वेळेस जम्मु काश्मिर ते कन्याकुमारी अशी संघर्ष यात्रा काढली. ही यात्रा संपुर्ण भारतात काढण्यात आली.
दुस-या वेळेस कन्याकुमारी ते जम्मु काश्मीर अशी संघर्ष यात्रा काढली.परंतु कन्याकुमारी येथे पोलिसांनी अडथळा आणला.त्यामुळे ही यात्रा दुस-या राज्यातुन काढावी लागली.
भारतातील व महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, धार्मिक संघटना आर.एस.एस.च्या नावाने जोरजोरात शंख वाजवतात,पण आर.एस.एस.च्या विरोधात एकाचीही आंदोलन करण्याची हिंमत दाखवित नाही.
परंतु वामन मेश्राम यांनी त्यांच्या साडेतीन लक्ष अनुयायांसह नागपुर येथील RSS चे मुख्यालय ६ ऑक्टोबर २०२२ रोजी घेरले व भाजपा,आर.एस.एस.ची दाणादाण त्यांच्या घरात घुसुन उडवली.जे कधीच कोणाला जमले नाही ते या नावाने त्याने करुन दाखविले,परंतु बिकाऊ मिडिया कधी पुढे आला नाही,हो जी प्रसिद्धी मिळाली ती सोशल मिडियामुळेच मिळाली.
३० जानेवारी २०२४ रोजी (या क्लिपमधील बातमी) दिल्ली येथील जंतर मंतर वर लाखो लोकांच्या साक्षीने ईव्हीएम विरोधात भारत मुक्ती मोर्चाने आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व केले ते भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.वामन मेश्राम साहेब यांनी…. या वेळी भारतभरातुन आलेल्या लाखो लोकांनी केलेल्या आंदोलनाला मिडिया,राजकीय पक्षांनी black out केले.
सन २०१३ पासुन मा.वामन मेश्राम साहेब यांनी सुरु केलेल्या ईव्हीएमच्या विरोधातील लढाईत कोणत्याही राष्ट्रीय,राज्य,विभाग,जिल्हा पातळीवरील पक्षाने कधी सहभाग घेतला नाही….ना त्यांच्या नेत्यांनी…. एकटे ही लढाई राष्ट्रीय पातळीवर लढण्याचे काम मेश्राम साहेबांनी केले.
आता या पक्षांच्या पिछवाड्यावर भाजपा व निवडणुक आयोगाने लाथा घातल्यावर या पक्षांना मेश्राम साहेबांनी सुरु केलेल्या ईव्हीएमच्या विरोधातील आंदोलनाचे महत्व कळाले व ते खडबडुन जागे झाले.
आता ईव्हीएमच्या विरोधात जो तो बोलायला लागला….परंतु याचे सर्व श्रेय हे मेश्राम साहेबांनाच जाते हे सत्य नाकारुन चालणार नाही, भले कोणी कितीही लपविण्याचा प्रयत्न करो…..
ईव्हीएममुळे लोकशाही,मताधिकार, छोटे,मोठे,राज्यस्तरीय पक्षांचे अस्तित्व नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.ही गोष्ट आता या पक्षांच्या लक्षात आलेली आहे.पण हे पक्ष कायमस्वरूपी ठोस भुमिका घेऊन जनआंदोलन उभारतील याचा विश्वास भारतीय जनतेला नाही.हे सूध्दा सत्य आहे.
यापुर्वी कॉंग्रेस व कॉंग्रेस सोबत असलेल्या २२ पक्षांनी काय धोखाघडी केली याचा इतिहास ताजा आहे,जो इतिहास जनता अजुन विसरलेली नाही.
लोकशाही,मत व संविधान वाचवायचे असेल तर भारत मुक्ती मोर्चा व मा.वामन मेश्राम साहेबच वाचवु शकतात,यावर लोकांचा विश्वास बसला आहे.
मा.वामन मेश्राम साहेब ईव्हीएमच्या विरोधातील अंतिम लढाई लढण्याच्या तयारीला लागलेले आहेत.ही लढाई कधी सुरु होते. याचीच जिज्ञासा लोकांमध्ये वाढीस लागली आहे.
आपण या लढाईत सामिल व्हावे ही अपेक्षा व विनंती.
*आपला*
सुमित्र अहिरे
राज्य सहसंयोजक बहुजन क्रांती मोर्चा



