जळगावा जिल्हामुक्ताईनगर

ईव्हीएम मशीन हटाव व बॅलेट पेपर वर पुढील निवडणूक घ्यावी यासाठी जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे स्वाक्षरी मोहीम…

मुक्ताईनगर प्रतिनिधी

मुक्ताईनगर येथे तालुका काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटी तर्फे ईव्हीएम मशीन हटाव व पुढील निवडणुका बॅलेट पेपर वरती व्हाव्यात यासाठी स्वाक्षरी मोहिमेसाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रदीप दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली स्वाक्षरी अभिनयाला सुरुवात करण्यात आली.नुकतीच शासकीय विश्रामगृह मुक्ताईनगर येथे जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रदीप दादा पवार यांच्या अध्यक्षस्थानी आढावा बैठक घेण्यात आली.याप्रसंगी जिल्हाध्यक्ष यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशावरून आपल्याला सर्वांना ईव्हीएम मशीन हटाव यासाठी सर्वांनी आवर्जून स्वाक्षरी अभियानात जास्तीत जास्त स्वाक्षऱ्या घेऊन अभियान यशस्वी करावं या सूचना केल्या.याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य डॉ जगदीश पाटील,व्ही जी एन टी सेल प्रवक्ते एडवोकेट अरविंद गोसावी,मुक्ताईनगर काँग्रेस तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, जिल्हा सरचिटणीस संजय प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस आशुतोष पवार, एसी सेल चे जिल्हा उपाध्यक्ष बि.डी गवई साहेब,इंटकचे उत्तर महाराष्ट्र संजय चौधरी,जिल्हा पदाधिकारी यासीन खान,युवकचे विधानसभा क्षेत्र प्रमुख राजेंद्र जाधव, मुक्ताईनगर युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर इंगळे, मुक्ताईनगर शहराध्यक्ष दिपक धायडे,अल्पसंख्यांक शहराध्यक्ष आरिफ रब्बानी,विनोद पारसकर, तालुका काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button