प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत मार्गदर्शन वबारा बलुतेदारांच्या मेळाव्याला प्रतिसाद

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
संग्रामपूर तालुका प्रतिनिधी भगवान पाखरे
पारंपारिक कारागिरांचे मनोबल वाढवण्यासाठी योजना माजी मंत्री आमदार डॉक्टर संजय कुटे जळगाव जामोद येथे आयोजित ,प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना मार्गदर्शन बारा बलुतेदार बांधवांच्या भव्य मेळाव्याला त्यांनी संबोधित केले.यावेळी उपस्थित बांधवांना प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेची माहिती दिली.सर्वसामान्य लोकांना आपलंसं वाटणार नेतृत्व म्हणून नरेंद्र मोदी जी ओळखले जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना आणली असल्याचे डॉक्टर संजय कुठे यांनी सांगितले.
पंतप्रधान आवास योजना,आयुष्यमान भारत योजना, पंतप्रधान गरीब कल्याण योजना,पंतप्रधान किसान सन्मान योजना, मुद्रा योजना ,स्वच्छ भारत योजना, जल ही जीवन अभियानाचा योजनेतून जनतेला झालेला फायदा यावरही डॉक्टर संजय कुटे यांनी भाष्य केले.
प्रास्ताविकात प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना समिती जिल्हा सदस्य रवींद्र शेठ ढोकणे यांनी या योजनेची माहिती दिली.
प्रारंभी भगवान विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण कुटे यांनी केले. पीएम विश्वकर्मा योजना या समितीचे जिल्हा संयोजक श्रीकांत आव्हेकार यांची उपस्थिती होती. संचालन चंद्रकांत शिंदे यांनी तर आभार अनिल उंबरकर यांनी मांडले.
मेळावा यशस्वी साठी कैलास राजूस्कर कैलास सोनवणे आनंद वानखडे किसना ताथ्होरकर नितीन तांबटकर मंगेश वेलकर राजश्रीनाथ चंद्रकांत शेगोकार चांदुरकर आधी सह यांनी परिश्रम घेतले .



