इंग्रजांच्या विरोधात पहिला सशस्त्र लढा देणारे राजे उमाजी नाईक यांची आज जयंती.

इंग्रजांच्या विरोधात पहिला सशस्त्र लढा देणारे राजे उमाजी नाईक यांची आज जयंती.
राजे उमाजी नाईक यांचा जन्म रामोशी समाजात ७ सप्टेंबर १७९१ ला झाला . त्यांनी इंग्रजांच्या विरोधात रामोशी समाजाला संघटित करून इंग्रजांच्या विरोधात सशस्त्र लढा देण्यास तयार केले . पाच पाच हजारांची सर्व जाती , धर्माची एक तुकडी तयार करून त्यांना विविध विभागात तैनात केले . ब्रिटिशांच्या गुप्त बातम्या मिळविणारी स्वतंत्र टोळी तयार केली . स्वतंत्र हेर खाते तयार केले .
१८१८ मध्ये त्यांना इंग्रजांनी पकडुन एक वर्षाची सजा सुनावली . तुरुंगात असताना त्यांनी विविध प्रकारचे शिक्षण घेतले. २२ जुलै १८२६ रोजी जेजुरी येथे स्वतःचा राज्याभिषेक करवून घेतला . सलग १४ वर्षे इंग्रजांच्या विरोधात सशस्त्र लढा दिला असता त्यांना १५ डिसेंबर १८३१ रोजी अटक झाली , त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा खटला चालविला . न्यायमूर्ती जेम्स टेलर यांनी त्यांना फाशीची शिक्षा सुनावली .
उमाजी नाईक यांच्या विषयी त्यांना पकडुन राष्ट्रद्रोहाचा खटला भरणारे इंग्रज अधिकारी मॅकिन्टॉश यांनी इंग्रज सरकारला लिहिलेल्या पत्रात उमाजी नाईक यांच्या विषयी माहिती दिली असून त्यात लिहिले आहे की , ” उमाजी यांना फाशी दिली नसती तर ते दुसरे शिवाजी झाले असते .”
इंग्रजांच्या विरोधात सशस्त्र लढा उभारून फासावर जाणाऱ्या भारतातील या पहिल्या क्रांतिकारकास त्यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.
जयसिंग वाघ



