महाराष्ट्रविदर्भ

केनवड जवळ चाणक्य ट्रॅव्हल्स बसचा अपघात

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

वाशिम:- नागपूर मुंबई या राष्ट्रिय महामार्गावर रविवार दि.२७ ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास मालेगाव मेहकर रोडवर केनवड नजिक चाणक्य ट्रॅव्हल्स क्र.एम एच २९ एम ८४९६ यवतमाळ वरून पुण्याकडे जात असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगत असलेल्या नालीमध्ये जाऊन उलटली.सदर बसमध्ये अंदाजे 35 ते 40 प्रवासी प्रवास करत असल्याची प्रथम दर्शनी माहिती मिळाली त्यानुसार ट्रॅव्हल्स च्या केबिनमध्ये बसून प्रवास करीत असलेल्या 8 ते 10 लोकांना किरकोळ मार लागल्याने पुढील उपचारासाठी वाशिम येथे 108 अँब्युलन्स ने पाठविण्यात आले असून इतर प्रवासी सुखरूप आहेत यामधे कोणतीही जीवित हानी झाली नाही. परंतु अपघात घडताच घटनास्थळावरून वाहन चालकांने पळ काढण्याचे तिथे उपस्थित नागरिकांचे म्हणणे होते.

शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या केनवड समोर संदीप हॉटेल जवळ ३० ते ४० प्रवासी घेऊन प्रवास करणारी चाणक्य ट्रॅव्हल्स चा अपघात झाला. बसच्या वाहकाने दिलेल्या माहितीनुसार समोरील काच अचानकपणे सुटल्याने हा अपघात घडला असल्याचे सांगितले.यामध्ये आठ ते दहा प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळाली. परंतु धक्कादायक माहिती अशी की दुर्गा दुर्घटनाग्रस्त झालेली बसच्या मागेच विद्युत पोल होते. तसेच समोरच्या दिशेने पाच ते सात फुटाच्या अंतरावर बाभळीचे झाड होते दुर्दैवाने ही बस जर या दोन्ही वस्तूंच्या संपर्कात आली असती तर मोठी दुर्घटना झाली असती.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button