आसलगाव येथे पी एम श्री हायस्कूल मध्ये पत्रकार दिन मोठ्या उत्सवात साजरा…

आसलगाव येथे पी एम श्री हायस्कूल मध्ये पत्रकार दिन मोठ्या उत्सवात साजरा…
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी हरिदास इंदोरे जळगाव जामोद
आसलगाव पी एम श्री
हायस्कूल येथे पत्रकार दिन मोठ्या उत्सवात साजरा आसलगाव दि 6 जानेवारी मराठी पारितेकेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृति दिनानिमित्त पत्रकार दिनाचे औचित्य साधून आसलगाव येथील पीएम. श्री हायस्कूल येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यामध्ये स्थानिक पत्रकारांचे शाल, पुष्पगुच्छ, उत्सवात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा समितीचे अध्यक्ष भगवान भाऊ टापरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले वरिष्ठ पत्रकार गणेश भाऊ गिऱ्हे यांनी आपल्या मनोगतात त्यांनी पत्रकारितेच्या योगदानाचे महत्त्व विशद करत सांगितले की ” पत्रकार हे समाजाचे डोळे व कान आहेत त्यांच्या निर्भीड लेखनामुळे अन्यायाला वाचा फुटते आणि विकासाला दिशा मिळते आसल गावाच्या जडणघडणीत पत्रकार बांधवांचे कार्य मोलाचे आहे देवेंद्र सोमवंशी ठाकूर यांनी सुद्धा आपले मनोगत विद्यार्थ्यांसमोर व्यक्त केले पत्रकारांनीही आपले अनुभव व्यक्त केले. ग्रामीण भागात भागातील प्रश्न शिक्षण, आरोग्य, शेती, आणि सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी माध्यमांची भूमिका किती प्रभावी ठरते यावर त्यांनी मार्गदर्शन केले शाळेच्या विद्यार्थ्यांनी बाळशास्त्री जांभेकर त्यांच्या जीवन कार्यावर आधारित छोटे खानी सादरीकरण करून आद्य पत्रकारास अभिवादन केले यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते अमोल भगत सर यांनी लोकहिताच्या लढ्याला शाळा नेहमीच पाठबळ देईल अशी ग्वाही दिली यावेळी वरिष्ठ पत्रकार दत्तू भाऊ दांडगे, वरिष्ठ पत्रकार गणेश भाऊ गिऱ्हे, पत्रकार देवेंद्र सिंग ठाकूर, पत्रकार मदन बर्डे, पत्रकार दिलीप भाऊ इंगळे, पत्रकार सुनील निर्मळ, पत्रकार संजय भाऊ दांडगे, पत्रकार मुन्ना भाऊ रावण चौरे, शाळा समितीचे उपाध्यक्ष जीवन भाऊ रायपुरे, व स्टार भारत न्यूजचे पत्रकार हरिदास इंदोरे आदी उपस्थित होते. पीएमश्री हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रेम सिंग राठोड सर, डोंगरे सर, भोपळे सर, आढाव सर, जाधव सर, मोहोळ सर, उगले सर घोंगे सर, विठ्ठल राऊत सर,जैन मॅडम, शोगोकार मॅडम आदी उपस्थित होते.



