तेल्हाऱ्यात खाजगीकरण व कंत्राटीकरणा विरोधात युवकांचा आक्रोश व धरणे आंदोलन निषेध मोर्चा*

*तेल्हाऱ्यात खाजगीकरण व कंत्राटीकरणा विरोधात युवकांचा आक्रोश व धरणे आंदोलन निषेध मोर्चा*
*विद्यार्थ्यांचे जीवन उद्ध्वस्त करणारा कायदा त्वरित रद्द करण्यात यावा!
*स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
तेल्हाराता.प्रतिनिधी-व्हि एम घोडे
तेल्हारा.दि १३ – शासनाच्या वाढत्या खाजगीकरण कंत्राटी नोकरीचे शासन निर्णय (जिआर) रद्द करणे बाबत तेल्हाऱ्यात १३ ऑक्टोंबर रोजी टॉवर चोक ते तहसिल कार्यालय तेल्हारा पर्यंत विदर्भ स्पर्धा परीक्षा शिक्षक व विद्यार्थी संघ अकोला यांच्या वतीने धरणे आंदोलन आक्रोश मोर्चा प्रा. सचिनकुमार गव्हाळे सर यांच्या नेतृत्वाखाली संवैधानिक मार्गाने काढण्यात आला,यावेळी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना तहसिलदार तेल्हारा मार्फत निवेदन देण्यात आले यावेळी निवेदनात नमूद विद्यार्थी हे रात्र-रात्र भर विद्यार्थी अभ्यास करुन आपल्या भावी आयुष्यात शासकीय नोकरी मिळण्या करीता अनेक वर्षे संघर्ष करीत असताना शासनाने अचानकपणे नोकर भरती ही खाजगी कंत्राटीकरणे करुन असा *शासन निर्णय दिनांक ०६ सप्टेंबर २०२३ व दि. १८.०२.२०२३ ला खाजगीकरण करुन काढला जो पूर्णपणे चुकीचा व निंदणीय व विद्यार्थ्याचे जिवन उध्वस्त करणारा आहे. असे सुद्धा निवेदनात नमूद आहे* निवेदनावर एस के करीयर अकडमी चे प्रा सचिनकुमार गव्हाळे सर, संभाजी करीयर एकडमी चे प्रा ताकोते सर सह असंख्य विद्यार्थी विद्यार्थिनींच्या सह्या आहेत.निवेदनात नमूद मुद्दे*1. दि. 06 सप्टेंबर 2023 रोजी काढण्यात आलेला कंत्राटी पदभरती संदर्भातील शासन निर्णय त्वरीत रद्द करण्यात यावा.**2. राज्यसरकारने 62 हजार शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरीत रद्द करून सरकारी शाळांचा दर्जा अधिक प्रमाणात वाढवण्यात यावा**3. राज्यातील स्पर्धा परिक्षांच्या पेपर फुटीवर कडक कायदा करण्यात यावा जेणे करून पेपर फुटी थांबेल.**4. राज्यात वर्षभरात होणा-या विविध पदभरती प्रक्रियेसाठी (म. प्र. धरतीवर) एकच परिक्षा शुल्क आकारण्यात यावे**5. राज्यातील सर्व सर्व प्रकारची पदभरती प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत घेण्यात यावे**6. सरकारी क्षेत्रांचे खाजगीकरण व कंत्राटीकरण त्वरीत थांबविण्यात यावे.*




