जळगावा जिल्हा

मुक्ताईनगरमध्ये विनापरवाना एजंटांचा सुळसुळाट

प्लॉटचे भाव गगनाला भिडले; नागरिकांमध्ये चिंता

मुक्ताईनगर । प्रतिनिधी ।

शहरात विनापरवाना आणि अनधिकृत ब्रोकरांची संख्या झपाट्याने वाढत असून याचा थेट परिणाम प्लॉटच्या किमतींवर होत आहे. जळगावसारख्या मोठ्या शहरांतही जे भाव दिसत नाहीत, तेच अवास्तव दर मुक्ताईनगरमध्ये आकारले जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्थानिकांच्या माहितीनुसार, अनेक ब्रोकर प्लॉट विकत घेतल्यानंतर तात्काळ “आम्हीच प्लॉटवर दोन पैसे कमवून देऊ, आम्हीच ग्राहक दाखवू” अशा खोट्या आश्वासनांद्वारे नागरिकांची दिशाभूल करत आहेत. परिणामी सामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत असल्याची चर्चा शहरात वाढू लागली आहे.

शहरातील एका अधिकृत नोंदणीकृत ब्रोकर वगळता तब्बल २०० पर्यंत अनधिकृत ब्रोकर व्यवहार करत असल्याचे समोर येत आहे. लाखो रुपयांच्या व्यवहारात केवळ शासकीय किंमतीनुसार महसूल भरला जात असला, तरी उर्वरित रक्कम काळ्या पैशात फिरत असून शासनाच्या महसुला लाही मोठा तडा जात आहे.

गेल्या काही वर्षांत प्लॉटचे भाव

प्रचंड वाढल्याने हातावर पोट भरणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांचे घरकुलाचे स्वप्न अधिकच दूर गेले आहे. व्यापारी व नोकरदार वर्गाने अनेक मोक्याच्या जागा आधीच खरेदी केल्याने सामान्य नागरिकांकडे पर्यायच उरलेला नाही. “प्लॉटचे दर लाखोंमध्ये जात असताना मध्यमवर्गीय नागरिक घर कसे बांधणार?” असा संताप व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, २००१ पासून श्री राम रहीम रियल इस्टेट कन्सल्टंट मुक्ताईनगर नावाने अधिकृत नोंदणी असलेला एकच अधिकृत ब्रोकर शहरात कार्यरत असताना शेकडो + अनधिकृत ब्रोकरांची संख्या वाढणे हे प्रशासनाच्या दुर्लक्षाचे परिणाम असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे शासनाचा महसूल बुडत असून नागरिकांचे आर्थिक नुकसानही प्रचंड प्रमाणात होत आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. अनधिकृत व बोगस ब्रोकरांवर कारवाई करून प्लॉट बाजारातील अनियमितता आटोक्यात आणावी, अन्यथा मुक्ताईनगर शहरातील सर्वसामान्यांना घर बांधणे अधिकाधिक कठीण होईल, अशी भावना जनतेतून व्यक्त होत आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button