महाराष्ट्रसामाजिक

महावीर पतसंस्थेची ३० वी वार्षिक आमसभा.

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

मालेगाव : – संपूर्ण जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थेत प्रसिध्द असलेली महावीर ग्रामीण सह. पतसंस्था मर्या. मालेगाव र.नं. १२०३ ची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा दि. २९ सप्टेंबर २०२४ रोजी पार पडली.
सभेच्या अध्यक्ष स्थानी संस्थेचे अध्यक्ष धन्यकुमार बांडे तर उपाध्यक्ष स्थानी हुकुमचंद कान्हेड तसेच संस्थेचे जेष्ठ संचालक बवन गोरे होते आणि प्रमुख पाहुणे म्हणून कुलभूषण टिकाईत व हर्षद आहाळे हे होते
सर्वप्रथम दिपप्रज्वलन करुन श्री १००८ भगवान महावीर यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. नंतर सभेला रितसर सुरुवात करुन प्रथम मयत सभासदांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली त्यानंतर संस्थेचे नियमित कर्ज भरणा करणाऱ्या सभासदांचा सत्कार करण्यात आला आणि त्यानंतर विषयपत्रीकेतील विषयाचे विषयावार वाचन संस्थेचे व्यवस्थापक शशिकांत रवणे, सहा. व्यवस्थापक निखिलजी बांडे व कर्मचारी आशिष जोगदंड यांनी केले प्रत्येक विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली व त्यास आमसभेने एकमताने मान्यता दिली.
यानंतर संस्थेचे सभासद यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना मा. अध्यक्ष धन्यकुमारजी बांडे यांनी उपस्थित सभासदांना माहिती दिली की, आपल्या पतसंस्थेचा नफा रु. ६३ लाख ५५ हजार ४९९ ऐवढा झाला आहे. तसेच गत वर्षात सर्व सभासदर्दाना त्यांच्या शेअर रक्कमेवर १२ टक्के प्रमाणे लाभांश देण्यात आला होता व चालु वर्षात सुध्दा तो १२ टक्के देण्याचा ठराव पास झाला. संपुर्ण कार्यक्रमाचे संचालन हे संस्थेचे सभासद धिरज बांडे यांनी केले यानंतर संस्थेचे संचालक विजय गोरे यांनी आभार प्रदर्शन केले.
सभेला संस्थेचे संचालक विजय टिकाईत, रविंद्र सावले, निखिल गोरे, जयंतराव सांगळे, जनार्धन सरकटे, सौ. अलका गोरे व श्रीमती. सिमा कान्हेड हे सर्व संचालक तथा कर्मचारी संजय कान्हेड, अरविंद गोरे, जितेंद्र डहाळे, शिपाई सुरज कान्हेड, अक्षय सावले हे उपस्थित होते. तसेच सभा उत्कृष्ट रित्यापार पाडण्यात धिरज बांडे यांनी विशेष सहकार्य केले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button