उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराची रक्कम शिक्षकाने मानवसेवा प्रकल्प ला दिली भेट

सटार भारत लाईव्ह एकसप्रेस
चिखली,,,, प्रतिनिधी
चिखली (प्रशांत डोंगरदिवे) :- शिक्षण प्रसारक मंडळाचे आदर्श विद्यालय चे प्रा मिलिंद आनंदराव हिवाळे यांना १ मे महाराष्ट्र दिन निमित्त उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार मिळाला तो पुरस्कार आर्थिक स्वरूपाचा असल्याने त्यांनी तो पुरस्कार मानवसेवा प्रकल्प च्या तुकाराम आश्रय वृद्धाश्रमातील निराधार वृद्धांच्या सेवेकरिता प्रदान केला.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार सुधीर लंके माजी अधीक्षक ढेंगजोडे आप्पा, प्राचार्य सतीश गव्हले, उपप्राचार्य श्रीपाद दंडे, पर्यवेक्षक खेडेकर मॅडम, भावसार मॅडम, सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तथा विद्यार्थी व पालक यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र दिन कामगार दिन साजरा झाला. तसेच वर्षभरातील काम काजाच्या नियोजनावर उत्कृष्ट आदर्श शिक्षक पुरस्कार माजी शिक्षक आमदार स्व. नानासाहेब लंके यांच्या स्मृति प्रित्यर्थ दिल्या जातो या वर्षीचा पुरस्कार कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक प्राध्यापक मिलिंद आनंदराव हिवाळे यांना देण्यात आला. प्राध्यापक मिलिंद हिवाळे यांनी पुरस्कार स्वीकारताना आभार व्यक्त करून विद्यार्थी हित जोपासण्याचे आव्हान करून आलेली राशी मानव सेवा प्रकल्प अंतर्गत तुकाराम आश्रय वृद्धाश्रम भोकर येथील निराधार वृद्धांच्या सेवेकरिता संचालक प्रशांत डोंगरदिवे यांना सर्व उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत सपूर्त केली.त्यांच्या या कार्याचे सुधीर लंके यांच्या सह सर्वानी कौतुक केले. तर निराधार वृद्धांच्या सेवेकरिता नेहमीच मदत करू असे आश्वासन त्यानी यावेळी केले.
कार्यक्रमाचे संचलन मुकेश भवर तर आभार प्रदर्शन श्रीपाद दंडे यांनी केले.अशा प्रकारे हा महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला.



