बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

अकोलीतील बेमुदत अन्नत्याग उपोषणाला ASP प्रदेश सचिव सुजित बांगर यांची भेट; ग्रामस्थांच्या न्याय्य मागण्यांना जाहीर पाठिंबा…..!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद

संग्रामपूर:- २२ जुलै २०२६
पिण्याच्या पाण्याच्या आर.ओ. प्लांटपासून रस्ते, गटारी, सीसीटीव्ही, विद्यार्थ्यांसाठी ‘मिड-डे मील’ व आदिवासी बांधवांच्या वीज जोडणीपर्यंत विविध मागण्यांचे निवेदन २० जुलैपासून उपोषण सुरू. संग्रामपूर तालुक्यातील अकोली येथील ग्रामस्थांनी गावातील प्रलंबित मूलभूत सुविधांबाबत प्रशासनाच्या दिरंगाईचा निषेध करत बेमुदत उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. यापूर्वी ३० जून २०२६ रोजी ग्रामपंचायत प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी पुन्हा निवेदन सादर करून २० जुलै २०२६ पासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
निवेदनात ग्रामस्थांनी स्पष्ट नमूद केले आहे की, गेल्या पाच ते सहा वर्षांपासून बंद असलेला पिण्याच्या पाण्याचा आर.ओ. प्लांट तातडीने दुरुस्त करून सुरू करावा. गावातील पहिल्या संरक्षण भिंतीची पावसामुळे झालेली पडझड त्वरित दुरुस्त करावी. तसेच गावातील सांडपाण्याच्या नाल्यांची स्वच्छता करून नागरिकांना दुर्गंधी व अस्वच्छतेपासून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय गावातील खराब व नादुरुस्त रस्त्यांची दुरुस्ती, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ‘मिड-डे मील’ शिजविण्यासाठी आवश्यक भांडी उपलब्ध करून देणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारक परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, तसेच मालठाणा बु. येथील आदिवासी बांधवांना वीज कनेक्शन व पाणीपुरवठ्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाकडून केवळ आश्वासने मिळत असून प्रत्यक्षात कोणतीही कामे पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे अखेर ग्रामस्थांनी बेमुदत उपोषणाचा निर्णय घेतला असून, उपोषणादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्यास संबंधित प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.
दरम्यान, सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाला आझाद समाज पार्टी (ASP) चे प्रदेश सचिव सुजित बांगर यांनी भेट देत उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. ग्रामस्थांच्या मागण्या रास्त असून प्रशासनाने त्यांची तातडीने दखल घेऊन प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत, अशी मागणी त्यांनी यावेळी केली…….✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button