विभागीय परीक्षेत यश मिळवत डॉ. मुकीम पटेल सर यांची केंद्रप्रमुखपदी पदोन्नती; भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा, सवणा येथे सत्कार

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
चिखली प्रतिनिधी:-सलमान पठाण
“ये कौन दुआओं में मुझे याद करता है,
मैं डूबता हूँ तो समंदर उछाल देता है।
उसकी मोहब्बत का असर कुछ ऐसा है,
हर मुश्किल में खुदा भी
संभाल लेता है।”
पूर्वीपासून सवणा केंद्राचा प्रभार यशस्वीपणे सांभाळणारे आदरणीय डॉ. मुकीम पटेल सर यांची विभागीय परीक्षेत यश संपादन करून केंद्रप्रमुख पदावर पदोन्नती झाल्याबद्दल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा, सवणा येथे त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी अध्यक्षपती मा. श्री. दीपकभाऊ खडके, माजी अध्यक्ष श्री. सुधाभाऊ भुतेकर, उर्दू शाळेचे मुख्याध्यापक श्री. फिरोज देशमुख सर, उपाध्यक्षपती श्री. ज्ञानेश्वरभाऊ भुसारी, श्री. विजुभाऊ पवार तसेच सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. सोमकांत साखरे सर यांनी केले. तर श्री. राजेश साळवे सर, श्री. प्रवीण सोनाळकर सर, श्री. जावेद खान सर आणि श्री. दीपकभाऊ खडके यांनी मनोगत व्यक्त केले.
सत्काराला उत्तर देताना डॉ. मुकीम पटेल सर म्हणाले, “विद्यार्थ्यांसाठी प्रामाणिकपणे आणि निस्वार्थ भावनेने केलेल्या कार्यामुळे व त्यांच्या आशीर्वादामुळेच हे यश मिळाले आहे. कोणत्याही पदावर गेलो तरी अध्यापन कार्य पूर्वीप्रमाणेच सुरू ठेवणार असून, आपण सुरू केलेले ‘मिशन आयएएस-आयपीएस’ यशस्वी झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. मोबीन शेख सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. भिकाजी नालींदे सर यांनी केले.



