मेरा चौकी ते भरोसा रस्त्याची निकृष्ट कामामुळे दयनीय अवस्था….

स्टार भारत लाईव्ह एकसप्रेस
चिखली :तालुखा: प्रतिनिधी
अरुणा दत्तात्रय खंडागळे
देऊळगांव: धनगर ते मेरा चौकी पर्यंत रहदारीच्या शासकीय रस्त्याची दयनीय अवस्था झालेली असून रस्त्यामध्ये ठिक-ठिकाणी मोठ-मोठाले खड्डे पडले असून वाहनधारकांस त्याचा जीव मुठीत धरुन त्या रस्त्याचा सामना करावा लागतो. इतकेच नव्हे तर सर्वसाधारण नागरिक, शाळेकरी विद्यार्थी, महिला, जेष्ठ नागरिक यासारख्यांना या रस्त्यावरुन ये-जा करावे लागते. त्यामुळे सदरच्या रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे त्यांना अडचणींचा सामना करावा लागत असून अनेक वेळा अपघात होवून कित्येकांना जीव सुध्दा गमवावा लागला आहे. कित्येकांनां अपघातामुळे दुखापत होवून वैद्यकीय उपचार घ्यावा लागला असून आर्थिक भूर्दंड सहन करावा लागला आहे.
दि. 03/01/2026 रोजी भरोसा या गावातून चिखली न्यायालयात माझ्या कामानिमित्त माझे मालकीचे व ताब्यातील दुचाकी वाहनाने प्रवास करीत असतांना व वाहतूकीच्या नियमाचे पूर्णपणे पालन करुन हळूवारपणे माझे ताब्यातील वाहन चालवित असतांना अचानकपणे भरोसा ते मेरा चौकी या रस्त्यावर महादेव मंदिराच्या मागे शे. अहेमद यांचे शेतालगत असलेल्या रस्त्यावरील मोठया खड्डयामध्ये माझे वाहन घसरुन स्लिप झाली व मी डाव्या बाजूला पडलो आणि माझ्या डाव्या हाताला दुखापत झाली. त्यामुळे मला रस्त्यावरुन जाणाऱ्या नागरिकांनी जवळच असलेल्या चिखली येथील डॉ.चिंचोले हॉस्पीटलमध्ये भरती केले असता,
ऍड जी पी थुट्टे त्यांनी वैद्यकीय उपचार केला मात्र दुखापत गंभीर असल्याने छत्रपती संभाजी नगर येथे पुढील उपचाराकरिता डॉ. सारंग व्यवहारे यांचेकडे पाठविण्यात आले.छत्रपती संभाजी नगर येथे माझ्या डाव्या हाताच्या खांद्यालगत शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे मला वैद्यकीय कारणास्तव जवळपास रु.1,00,000/- इतका झाला व एव्हडे नुकसान झाले असून 3 महिने मला बेड रेस्ट चा सल्ला देण्यात आला.
त्यामुळे सदरच्या कालावधीमध्ये मला माझे न्यायालयीन कामकाज करता आले नाही व त्या कालावधीत माझे आर्थिक नुकसान झाले आहे. एकदंरीत मला त्याकरिता आर्थिक, शारीरिक, मानसिक त्रास सहन करावा लागला असून त्याकरिता माझे रु. 4,00,000/- (चार लाख रुपये) इतके नुकसान झाले आहे.
ज्या कंत्राटदार अथवा शासकीय यंत्रणेमार्फत कामे केलेली आहेत ती अतिशय घाई-घाईत व कमी दर्जाचा माल वापरुन रस्त्याचे काम केली असल्याने व आपले विभागामार्फत त्या रस्त्याची कोणतीही पाहणी न करता कंत्राटदारास बिलाचे देयके सुध्दा अदा करण्यात आलेले आहे देऊळगांव धनगर ते मेरा चौकी ता. चिखली, जि. बुलडाणा पर्यंत असलेला 9 कि.मी. रस्त्यावर असलेली खड्डे जी प्रवाशांच्या जीवाला धोकादायक असल्याने तसेच या रस्त्याने अवजड वाहन जात असून सदरचा रस्ता हा सदरची नोटीस प्राप्त होताच योग्य दर्जाचे मटेरीयल वापरुन सदरचा रस्ता योग्य व दर्जेदार बनवून देण्यात यावा. जेणेकरुन भविष्यात सदरच्या रस्त्यावर कोणताही अपघात होणार नाही✍️



