नायगाव तापी नदीवरील इलेक्ट्रिक मोटारीचा करंट लागून तरुणाचा मृत्यू एका विरुद्ध भादवि कलम ( 304 अ )प्रमाणे मुक्ताईनगर पो स्टे ला गुन्हा दाखल :-

सविस्तर वृत्त असे की शामराव रामा मराठे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की त्यांचा भाचा नामे विजय उर्फ सोनू मराठे हा घरी त्याच्या मोठ्या भावाला मोटर चालू करून येतो असे सांगून गेला परंतु दुपारपर्यंत परत न आल्यामुळे मयताचा मोठा भाऊ याने नदी किनारी जाऊन बघितले असता सोनू हा मोटारी चा शॉक लागून पडलेला दिसला तत्काळ त्यांनी आरडाओरडा केल्यामुळे गावातील काही नागरिक तसेच पोलीस पाटील सरपंच यांनी नदीवर धाव घेतली तसेच पोलिसांना सुद्धा दूरध्वनीवरून संपर्क करून बोलवण्यात आले त्या ठिकाणी बसवलेली मोटर ही रवींद्र भास्कर पोहेकर यांच्या मालकीची आहे असे प्रत्यक्ष दर्शी गावकऱ्यांनी सांगितले आणि या मोटारीमध्ये करंट असल्याचे त्यांना माहिती दिलेली होती असे सुद्धा सांगण्यात आले परंतु त्यांनी हलगर्जीपणा केल्यामुळे आज तरुणाला जीव गमवावा लागला रवींद्र भास्कर पोहेकर यांच्या विरोधात माहित असून सुद्धा हलगर्जीपणा केल्यामुळे भादवि कलम (304 अ )प्रमाने मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे करत आहेत



