गुन्हेगारी

संशयावरून रेशनच्या तांदूळाचा ट्रक पकडला

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी श्याम पहूरकर

शेगाव । रेशनसाठी असलेल्या तांदूळाची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच खामगाव ग्रामीण पोलिस पथकाने मोठी कारवाई करत एमएच-१९-झेड-५१२८ हा ट्रक अडवून ताब्यात घेतला. तपासात ट्रकमधून तब्बल ५०० कट्टे तांदूळ सापडले. बाजारभावानुसार जप्त केलेल्या

तांदुळाची किंमत ६ लाख २४ हजार ७५० तर ट्रकची किंमत १५ लाख रूपये असल्याचे सांगण्यात येते.

प्राथमिक कारवाईनंतर ट्रक खामगाव ग्रामीण पोस्टेला डिटेन करण्यात आला. तांदळाची बेकायदेशीर वाहतुक होत असल्याचा संशय असल्याने
उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाने खामगाव
तहसीलदारांशी पत्रव्यवहार करत पुढील तपासाची माहिती दिली. पोलिसांनी चाक गोविंदा गोपाळराव मार्कंड (४९) रा.नांदुरा व वाहक योगेश जानराव (२५) रा. पारस जि. अकोला यांना ताब्यात घेतले असून तांदूळ नेमका कोठून आणला आणि कुठे नेला जात होता याबाबत चौकशी सुरू आहे. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील, पीएसआय निलेश लबडे, पोहेकॉ सुधाकर थोरात, पोकों विशाल कोळी, पवन मोरे यांनी केली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button