महाविकास आघाडीच्या वतीने अमित झनक यांनी भरला उमेदवारी अर्ज दाखल!

बळीराजाचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी हजारो कार्यकर्त्यांसह शेतकरी कष्टकरी यांची उपस्थिती “
वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
वाशिम : – ३३-रिसोड -मालेगाव विधानसभा मतदार संघाचा महाविकास आघाडीच्या वतीने रिसोड- मालेगाव मतदार संघात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अमित सुभाषराव झनक यांनी हजारो शेतकरी कष्टकरी व कार्यकर्त्याच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
झनकांचा वारसा पुढे घेऊन रिसोड मालेगाव मतदार संघाचे प्रतिनिधित्व अमित झनक आज पर्यंत करत आहेत. यावर्षी निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, या तिन पक्षाची महाविकास आघाडी निर्माण झाली आहे. या पक्षाच्या वाटाघाटीत रिसोड मतदार संघ हा काँग्रेसच्या वाट्याला आला. याच अनुषंगाने अमित झनक यांचा महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बळीराजा मित्र मंडळांकडून अमित झनक यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दामु अण्णा इंगोले यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्या अगोदर एन्ट्री घेऊन आमदार अमित झनक यांच्या सभेमध्ये येऊन आम्ही अमित झनक यांच्या सोबत असल्याचे सांगितले यावेळी रिसोड/मालेगाव तालुक्यातील शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तिन्ही पक्षाचे हजारो कार्यकर्त्यांनी अमित झनक यांच्या करीता शक्ती प्रदर्शन केले यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाराव खडसे, काँग्रेस नेते दिलीपरावजी सरनाईक, वाशिम जिल्हा संपर्कप्रमुख डॉक्टर सुधीर कव्हर, वाशिम विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर सिद्धार्थ देवळे, रिसोड विधानसभा सहसंपर्कप्रमुख विश्वनाथ सानप, जिल्हा परिषद उपाध्यक्ष चक्रधर जी गोटे, उपजिल्हाप्रमुख डॉ. चंद्रशेखर देशमुख, महाविकास आघाडीचे जिल्हा समन्वयक बाळासाहेब देशमुख, डॉ. शाम गाभणे, शेख गुलाब भाई आयुब सर, अशोक अंभोरे, रिसोड शिवसेना तालुका अध्यक्ष नारायण आरु, मालेगाव तालुकाध्यक्ष उद्धवराव गोडे, डॉक्टर गजानन सानप, गणेशराव देशमुख, प्रकाश तात्या चोपडे, डॉ. समाधान काठोळे, गजानन खोडे, पांडुरंग पाटील अवचार, कैलास इढोळे , सुरेश बाजड, शिवाजी सोनुने, राजू आरू गंगाधर आरु, बाळू ठाकरे संजय तिखे बाळासाहेब ठाकरे, संजय तिखे, संजय शिंदे, भुजंगराव भिसडे,सदिप घुगे,योगेश बळी,विकास अवचार,अभिषेक देवकते, शशिकांत टनमने,सागर जगताप, भारत गुडदे, शेषराव कुटे बोरगाव,अमोल लहाने, सरपंच सुरेश पाटील लहाने, माजी सरपंच राजूभाऊ लहाने, संचालक भूषण पाटील खाडे, माजी सरपंच बबन लहाने, एम.टी. लहाने ,गजानन राऊत, भगवान शिंदे, अक्तारखा पठाण, शे. गणीभाई शे. चाॅदभाई, गजानन शिंदे, बबनराव चोपडे, अरूण बळी, उत्तम नाईक, नंदकिशोर गायकवाड, विनायक कुटे, राजुभाऊ दहात्रे, संजय दहात्रे, मनोहर आप्पा महाजन संतोष ब. राऊत, डॉ डिगाबर पवार, राजु राऊत, गजानन केळे, अभिमन्यू राऊत मुंगळा, हजर होते.



