रावेर लोकसभा अंतर्गत मुक्ताईनगर येथे ‘सेवा पंधरवडा’ व ‘महास्वराज्य अभियान’ अंतर्गत आयोजित कार्यक्रमास, केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे उपस्थित…

रावेर लोकसभा अंतर्गत मुक्ताईनगर येथे ‘सेवा पंधरवडा’ व ‘महास्वराज्य अभियान’ अंतर्गत आयोजित कार्यक्रमास, केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे उपस्थित…
दिनांक १७ सप्टेंबर २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत “सेवा पंधरवडा २०२५” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, ‘छत्रपती शिवाजी महाराज महास्वराज्य अभियान’ अंतर्गत पंचायत समिती, मुक्ताईनगर मार्फत जनकल्याणकारी विविध कार्यक्रमांचे गोदावरी मंगल कार्यालय, मुक्ताईनगर येथे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह पालकमंत्री मा.ना.श्री.गुलाबराव पाटील, वस्त्रोद्योग मंत्री मा.ना.श्री.संजयजी सावकारे, जिल्हाधिकारी श्री.आयुष प्रसाद तसेच स्थानिक भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व प्रसासकीय अधिकारी आणि अंगणवाडी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.