महाराष्ट्र

अकोला जिल्हा किसान काँग्रेसच्या वतीने शेतकऱ्यांकरिता जिल्ह्यामध्ये अभियान सुरू

*अकोला जिल्हा किसान काँग्रेसच्या वतीने शेतकऱ्यांकरिता जिल्ह्यामध्ये अभियान सुरू*

विजय घोडे स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तेल्हारा तालुका प्रतिनिधी

अकोला जिल्हा किसान काँग्रेसच्या वतीने जिल्हाभर शेतकऱ्यांना योग्य व माफक दरात बियाणे व खते मिळावे याकरता किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवी पाटील लांडे यांच्या नेतृत्वामध्ये व अकोला जिल्हा ग्रामीण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोकराव अमानकर यांच्या सूचनेनुसार अकोला जिल्ह्यात अभियान सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून पातुर तालुक्यामध्ये पातुर तालुका किसान सेल अध्यक्ष हरिभाऊ चोपडे यांनी तालुका कृषी अधिकारी धनंजय सेठे कुषी सहायक विनोद देवकर यांना सोबत घेत शेतकऱ्यांना मूळ किमतीला बियाणे मिळावेत याकरता कृषी सेवा केंद्र तपासणी करून शेतकऱ्यांना योग्य किंमतीमध्ये खते व बियाणे उपलब्ध होतात की नाही याची पाहणी केली. यावेळी दिपा कुषी सेवा केंद्र चे मालक शंकरराव नाभरे तसेच शेतकरी गोपाल ठाकरे मनोहर वगरे रमेश सोळंके हीमंत महले व इतर शेतकऱ्यांनी त्याच्या या कार्याची प्रशंसा केली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button