गुन्हेगारीबुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

अवैध रेती वाहतूक करणारी तीन वाहने शेगाव महसूल विभागाने पकडली

अवैध रेती वाहतूक करणारी तीन वाहने शेगाव महसूल विभागाने पकडली

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी
श्याम पहुरकर

शेगाव महसूल पथकाने 27 जानेवारी रोजी शेगाव कालखेड रोडने अवैध रेतीचे वाहतूक करणारे बिना रायल्टी असलेले तीन वाहने पकडून पुढील कार्यवाही करिता शेगाव तहसील कार्यालयाच्या स्वाधीन केली. कार्यवाही करतेवेळी शेगाव तहसीलचे नायब तहसीलदार भागवत. मनसगाव मंडळ चे मंडळ अधिकारी के एस तांबारे. तलाठी वैशाली मालोदे. तलाठी अमोल गीते. तलाठी खिल्लारे. तलाठी अक्षय चौधरी. तलाठी इंगळे. कोतवाल वावरे. कोतवाल बघे. इत्यादी महसूलच्या कर्मचाऱ्यांनी तहसीलदार यांच्या आदेशानुसार विनापरवाना असलेली अवैध रेतीची वाहने व वाहनांचा केलेला पंचनामा अहवाल पुढील कार्यवाही करण्याकरिता शेगाव तहसीलदार यांना सुपूर्त केला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button